आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विभागीय आयुक्तांकडे युनियनची मागणी:ऑटोरिक्षा मीटर कॅलिब्रेशनसाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ द्या

औरंगाबाद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाडेवाढ लागू झाल्यानंतर ऑटोरिक्षाचे मीटर कॅलिब्रेशनसाठी आम्हाला पुरेसा वेळ दिला नाही. आता प्रशासनाने रिक्षांविरोधात तपासणी मोहीम सुरू केली आहे. यामुळे चालक त्रस्त झाले आहेत. दुसरीकाडे रिक्षा मीटर कॅलिब्रेशन करणाऱ्यांकडून जास्त पैसे घेऊन लूट केली जात आहे. प्रशासनाने आम्हाला ३१ डिसेंबरपर्यंत मुदत वाढवून द्यावी, यासह इतर काही मागण्यांचे निवेदन रिक्षाचालक संघटनांनी सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयात दिले.

प्रशासनाने अनेक वर्षांनंतर भाडेवाढ दिली आहे. त्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत रिक्षा मीटर कॅलिब्रेशनचा वेळ दिलेला असताना आरटीओने त्याआधीच कारवाई सुरू केली आहे. विशेष म्हणजे शहरात २५ हजारांपेक्षा अधिक परवानाधारक रिक्षा आहेत, पण मीटर कॅलिब्रेशनसाठी केवळ पाच केंद्रे आहेत. त्यामुळे सर्व रिक्षांचे मीटर अद्ययावत करण्यासाठी मोठा कालावधी लागणार आहे. त्यामुळे प्रशासनाने डिसेंबरअखेरपर्यंत मुदत वाढवून द्यावी. प्राधिकरण समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे नवीन रिक्षा थांबे द्यावेत, शेअरिंगच्या रिक्षाचे दरपत्रक जाहीर करावे, प्रवासी पिकअप व ड्रॉप पाइंट देण्यात यावे, चिकलठाणा विमानतळात रिक्षासाठी थांबा द्यावा, सिद्धार्थ गार्डन, प्रोझॉन मॉल, रिलायन्स या ठिकाणी रिक्षा थांबे द्यावेत, अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या चालकावर कठोर कारवाई करावी, ई-रिक्षाला मीटर नाहीत त्यांच्यावर कारवाई करावी, अशा मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. विभागीय उपायुक्तांना हे निवेदन देण्यात आले. या वेळी रिक्षाचालक संयुक्त कृती महासंघाचे अध्यक्ष निसार अहमद, छावा संघटनेचे मनोज जैस्वाल, प्रकाश शेंडगे, केशव गिरी, बिशन लोधे, गणेश सुपेकर आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...