आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:आरटीई प्रवेशासाठी मुदतवाढ, आता 31 जुलैपर्यंत करता येईल अर्ज; दोन मुदत वाढीनंतर 2 हजार 311 प्रवेश निश्‍चित

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • औरंगाबाद जिल्ह्यात यंदा या प्रवेश प्रक्रियेसाठी एकूण ६०३ शाळा पात्र आहेत.

आरटीई प्रवेश प्रक्रिया सध्या सुरु असून, २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठीच्या प्रवेशाच्या पहिल्या फेरीत २ हजार ३८२ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित झाले आहे. कोरोना तसेच तांत्रिक अडचणीमुळे ज्या पालकांना प्रवेश घेता आले नाही. त्यामुळे ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

आर्थिक दुर्बल घटकातील पालकांच्या पाल्यास शिक्षणाचा अधिकार मिळावा. यासाठी मोफत आणि सक्तीचा शिक्षण हक्क कायद्या २००९ करण्यात आला. या कायद्यानंतर्गत खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश देण्यात येतो. या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाइन प्रक्रिया राबवण्यात येते. गेल्या वर्षीपासून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता. प्रवेशाचा लकी ड्रॉ देखील ऑनलाइन काढण्यात आला.

औरंगाबाद जिल्ह्यात यंदा या प्रवेश प्रक्रियेसाठी एकूण ६०३ शाळा पात्र आहेत. तर एकूण प्रवेश क्षमता ही ३ हजार ६२५ आहे. ऑनलाइन काढलेल्या सोडत मध्ये प्रवेशासाठी ३ हजार ४७० विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. कोरोनामुळे पालकांना येत असलेल्या तांत्रिक अडचणी लक्षात घेता आत्तापर्यंत प्रवेशासाठी तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली. शुक्रवार दि 23 जुलै रोजी प्रवेशासाठी पालकांना अंतिम मुदत देण्यात आली होती. शुक्रवारपर्यंत एकूण २ हजार ३११ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित झाले आहेत. तर १ हजार ३८२ पालकांनी तात्पुरते प्रवेश घेतलेले आहेत. अशी माहिती शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...