आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाविकांच्या सेवेसाठी रेल्वेचा निर्णय:प्रयागराज व तिरुपतीला जाणाऱ्या विशेष गाड्यांना मुदतवाढ

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जालना, औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यातील भाविकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या जालना-तिरुपती जालना गाडी (०७४१३ व ०७४१४) तसेच जालना-छपरा जालना गाडी (०७६५१ व ०७६५२) या दोन विशेष साप्ताहिक गाड्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. जालना-छपरा विशेष गाडी जालन्याहून ४ जानेवारी ते १ फेब्रुवारीदरम्यान प्रत्येक बुधवारी सुटेल. परतीच्या प्रवासासाठी ६ जानेवारी ते ३ फेब्रुवारीदरम्यान प्रत्येक शुक्रवारी छपरा येथून सुटेल. जालना-तिरुपती विशेष रेल्वे जालन्याहून ८ जानेवारी ते ५ फेब्रुवारीदरम्यान प्रत्येक रविवारी सुटेल आणि परतीच्या प्रवासात ३ जानेवारी ते ३१ जानेवारीदरम्यान प्रत्येक मंगळवारी तिरुपती येथून निघेल.

बातम्या आणखी आहेत...