आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाची दोन कंपन्यांना मुदतवाढ:शहरातील 2,50,000 मालमत्तांचे सर्वेक्षण नऊ महिने लांबणीवर

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनपा स्मार्ट सिटी काॅर्पोरेशनने दोन कंपन्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ दिल्याने शहरातील अडीच लाख मालमत्तांचे सर्वेक्षण नऊ महिने लांबणीवर पडले आहे. तांत्रिक अडचणींमुळे हा निर्णय घेतल्याचे मनपा उपायुक्त अपर्णा थेटे यांचे म्हणणे आहे.

मालमत्तांसह विविध सुविधांच्या जीआयएस सर्वेक्षणासाठी अ‍ॅम्नेक्स आणि ई-गव्हर्नन्सचे ३१ माॅड्यूल तयार करण्यासाठी मार्क्स कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे. अॅम्नेक्सला सर्वेक्षणासाठी ११ कोटी रुपये दिले जाणार आहेत. कंपनीने आतापर्यंत झाडे, विद्युत खांब, खेळाची मैदाने, उद्याने, रस्ते आदींच्या प्रतिमा ड्रोन, गुगलने टिपल्या. या प्रतिमा आणि मनपा प्रशासनाकडील माहिती यांची जुळवणी सुरू झाली आहे. क्रीडा, उद्यान, ड्रेनेज, पाणीपुरवठ्याचे काम झाले. आता घनकचरा, शिक्षण, विद्युत, अग्निशमन, होर्डिंग्ज, मालमत्ता, नगररचनाचे होईल, असे उपायुक्त अपर्णा थेटे यांनी सांगितले. मालमत्तांवर नजर ठेवण्यासाठी सलग दहा वर्षे ड्रोनने सर्वेक्षण होणार आहे. मनपाचा कारभार फायलींविना, लोकोपयोगी करण्यासाठी ई गव्हर्नन्स संकल्पना राबवली जाते. त्यात २६ कोटी रुपये खर्चून ३१ प्रकारचे साॅफ्टवेअर तयार करण्याचे उद्दिष्ट

होते. त्यापैकी २८ साॅफ्टवेअर तयार झाल्याचा दावा थेटे यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...