आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराघाटीतील नेत्र, आणि कान-नाक-घसा विभाग सर्जिकल इमारतीत आहेत. आता हे दोन्ही विभाग सीव्हीटीएसच्या इमारतीत स्थलांतरित करण्यात येणार आहेत. प्रसूती विभागदेखील दुसऱ्या मजल्यावरून तळमजल्यावर आणण्यात येणार आहे. त्यामुळे या विभागाला जवळपास १२० वाढीव बेड मिळू शकतील, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. संजय राठोड यांनी दिली.
सीव्हीटीएस इमारतीतील सर्व विभाग सुपरस्पेशालिटीत स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे येथे अपघात विभाग हलवण्याचा प्रयत्न तत्कालीन प्रभारी अधिष्ठाता डाॅ. वर्षा रोटे यांनी केला होता. मात्र, यावर कार्यवाही झाली नाही. आता नेत्र, कान-नाक-घसा विभाग हलवण्याच्या हालचाली सुरू आहेत. नेत्र विभागाचे ८० आणि कान-नाक-घसाचे ४० असे १२० बेड आहेत.घाटीत दरवर्षी वीस हजारांपर्यंत प्रसूती होतात. तसेच शस्त्रक्रियांसाठी येणाऱ्या महिलांची संख्या मोठी असते. त्यामुळे केवळ ९० बेडच्या प्रसूती विभागात दोनशे ते अडीचशे महिला दाखल होतात. प्रसूती झाल्यानंतर महिलांना बेड मिळत नाहीत. त्यामुळे गादी टाकून महिलांना झोपावे लागते. आता हे दोन विभाग इतरत्र हलवल्यास प्रसूती विभागाचे दोन वाॅर्ड हलवता येणे शक्य आहे.
नॉर्मल प्रसूती आणि सीझरचे रुग्ण येथे हलवता येतील. गर्भपिशवी व इतर शस्त्रक्रिया दुसऱ्या मजल्यावर करता येतील. अधिकचे १२० बेड या विभागाला मिळू शकतात. त्यामुळे काहीसा ताण हलका होऊ शकतो. प्रसूती विभागही दुसऱ्या मजल्यावरून तळमजल्यावर आल्यास महिलांसाठी सोयीस्कर हाेईल.
परिचारिकांची संख्या वाढवावी लागणार प्रसूती विभागाचे दोन वाॅर्ड स्थलांतरित करण्यासाठी परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांची गरज भासेल. नवजात शिशू विभागदेखील तळमजल्यावर न्यावा लागेल. त्यामुळे चाळीसपेक्षा अधिक परिचारिका, कर्मचाऱ्यांची गरज भासेल. डाॅ. राठोड म्हणाले, हा विभाग पहिल्या मजल्यावर नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी लागणारा स्टाफ घाटी प्रशासनाकडून देण्यात येणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.