आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौभाग्यसागर महाराजांनी केले भाविकांना आवाहन:धैर्याने संकटावर मात करा, भयभीत होऊन पळू नका

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भगवान पार्श्वनाथ यांच्यावर अनेक संकटे आली तरीही त्यांनी शांतपणे सहन केले. त्यामुळे आलेल्या संकटांना घाबरून न जाता सामना करा, असे आवाहन बालयोगी आचार्य सौभाग्यसागर महाराज यांनी केले. पार्श्वनाथ दिगंबर जैन जटवाडा येथे भगवान पार्श्वनाथ जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त वार्षिक यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवात बालयोगी आचार्य सौभाग्यसागर महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी ते म्हणाले की, जैनगिरी क्षेत्राच्या विकासासाठी सर्व समाजबांधवांनी एकत्रित येऊन तन-मन-धनाने कार्य केले पाहिजे.

क्षेत्राच्या विकासासाठी सर्वांचा हातभार लागल्याने क्षेत्राची प्रगती होईल. दानधर्म करत राहा. त्यामुळे घरात कुठलीही कमी होत नाही, असा सल्लाही त्यांनी दिला. यात्रा महोत्सव यशस्वी करण्यासाठी डॉ. रमेश बडजाते, देवेंद्र काला, प्रकाशचंद कासलीवाल, सचिन कासलीवाल आदींनी सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...