आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चर्चासत्रात दिली सविस्तर माहिती:रेल्वेचे तिकीट यूटीएस मोबाइल अॅपद्वारे खरेदी करण्याची सुविधा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण मध्य रेल्वेने स्थानकांपासून २० किलोमीटर अंतरावरून तसेच अगदी घरातूनही अनारक्षित रेल्वे तिकीट खरेदी करण्याची सुविधा दिली आहे. मोबाइलवरून यूटीएस अॅपद्वारे हे तिकीट खरेदी करता येईल. नांदेड विभागातील वाणिज्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी यूटीएस मोबाइल तिकीट अॅपच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी गुरुवारी एका चर्चासत्राचे आयोजित केले होते. या वेळी वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक नागेंद्र प्रसाद, वाणिज्य व्यवस्थापक रवी तेजा, सहायक वाणिज्य व्यवस्थापक आर. मोझेस, नांदेड विभागातील वाणिज्य निरीक्षक, तिकीट तपासनीस, आरक्षण पर्यवेक्षक, बुकिंग पर्यवेक्षक आदी उपस्थित होते. श्री. के. सांबशिव राव, मुख्य वाणिज्य व्यवस्थापक (पॅसेंजर मार्केटिंग) यांनी प्रवाशांमध्ये यूटीआय मोबाइल अॅपचा वापर वाढवणे, प्रमुख स्थानकांवर उपलब्ध ऑटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशीन्सचा वापर करण्यासंदर्भात पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन दिले. डिजिटल पेमेंट वाढवा, वर्षअखेरीस तिकिटात यूटीआय अॅपचा हिस्सा २०% पर्यंत वाढवावा.

खरेदी केलेले तिकीट तपासनीसास मोबाइलवर दाखवता येईल. सीझन तिकीट १० दिवसांपूर्वी नूतनीकरण करू शकता. तिकीट खिडकीवर दिलेले क्यूआर कोड स्कॅन करूनही तिकीट खरेदी करता येते, असे ते म्हणाले. त्यामुळे आता तिकीट खरेदी करण्यासाठी मोठ्या रांगेत उभे राहण्याचीही गरज नाही तसेच रेल्वे स्टेशन येथे जाण्याचीही आवश्यकता नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...