आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Facing Severe Water Scarcity Crisis; As The Municipality Did Not Get Police Protection, The Action On Unauthorized Pipes Was Delayed Again |marathi News

पाणीटंचाई:तीव्र पाणीटंचाईचे संकट भेडसावत; पालिकेला पोलिस बंदोबस्त न मिळाल्याने अनधिकृत नळांवरील कारवाई पुन्हा रखडली

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तीव्र पाणीटंचाईचे संकट भेडसावत असलेल्या औरंगाबाद शहरातील शेकडो अनधिकृत नळांविरोधात १ जूनपासून कारवाई करण्याचे अखेर मनपाने जाहीर केले हाेते. मात्र पोलिस बंदोबस्त केव्हा मिळणार याबद्दल स्पष्टता नसल्यामुळे ही मोहीम पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले जाते. राजकीय नेत्यांच्या व मनपातील कर्मचाऱ्यांच्याच ‘आशीर्वादा’ने हे अवैध नळ कनेक्शन्स वाटण्यात आले आहेत,त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होण्याबाबत शंका उपस्थित होत आहे.

अनधिकृत नळ शोधून तोडण्याची कारवाई महापालिकेने सुरू केली आहे. मुख्य लेखाधिकारी संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई केली जात आहे. त्यासाठी विशेष पथकांची स्थापनादेखील करण्यात आली. या पथकांनी गेल्या आठवड्यात शहानूरवाडी भागातील गादिया विहार, त्रिशरण चौक यासह पडेगाव, पहाडसिंगपुरा, लक्ष्मी कॉलनी, शांतीपुरा, बेगमपुरा आदी भागात अनधिकृत नळांचा शोध घेतला.

मुख्य जलवाहिनीवरून हे कनेक्शन घेतल्याचे पथकाने केलेल्या पाहणीत स्पष्ट झाले. आठशेपेक्षा जास्त नळ कनेक्शन पथकांनी शोधून काढले. हे नळ कनेक्शन तोडण्यासाठी पालिकेने दोन वेळा नियोजन केले, परंतु पोलिस बंदोबस्ताशिवाय अनधिकृत नळ कनेक्शन तोडणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यावर त्या त्या भागातील पोलीस स्टेशनला बंदोबस्तासाठी प्रशासनाकडून अर्ज देण्यात आले. एक, दोन आणि तीन जून रोजी पोलिस बंदोबस्त देण्याचे आश्वासन पालिकेला मिळाले होते, पण ऐनवेळी पोलिस बंदोबस्त मिळाला नाही. त्यामुळे अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्याची कारवाई रद्द करावी लागली.

मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर कारवाईला येईल वेग
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ८ जून रोजी शहरात सभा आहे. तोपर्यंत अनधिकृत नळ कनेक्शन वापरणाऱ्या लाेकांचा रोष नको म्हणून मनपा प्रशासन वेगवेगळी कारणे देऊ कारवाई करणे टाळू शकते. पोलिस प्रशासनही ८ जूननंतरच मनपाच्या पथकाला संरक्षण देऊ शकते आणि त्यानंतरच कारवाईला वेग येईल, अशी शक्यता सूत्रांनी वर्तवली.

बातम्या आणखी आहेत...