आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:‘एमजीएम’मध्ये उद्यापासून ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम’

छत्रपती संभाजीनगर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एमजीएम विद्यापीठाच्या डॉ. जी. वाय. पाथ्रीकर संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयातर्फे १४ ते १८ मार्च यादरम्यान ‘बिग डाटा अॅनालिटिक्स’ या विषयावर पाच दिवसांच्या ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम’चे (एफडीपी) आयोजन केले आहे. विद्यापीठातील आर्यभट्ट हॉलमध्ये सकाळी ९:३० ते सायंकाळी ५ या वेळेत हा प्रोग्राम होणार आहे.

‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम’मध्ये सहभागासाठी संबंधित विद्याशाखेतील विषयतज्ज्ञ, संशोधक, प्राध्यापक, पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि संबंधित उद्योजक सहभागी होऊ शकतात. ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी महाविद्यालयाने https://forms.gle/s1MaD7hT41CpQtSA7 ही फॉर्मची लिंक उपलब्ध करून दिली आहे. ‘एफडीपी’मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्राप्ती देशमुख यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...