आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद महापालिका क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामांना गती द्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना बाबत संथ गतीने काम सुरू आहे. या बाबत मुंबईमध्ये बैठक घेण्यात आली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचा आढावा घेतला.
औरंगाबाद जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेचे बाबतीत फारसे काम झालेले नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधी सातत्याने याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. केंद्र शासनाच्या पातळीवर देखील औरंगाबाद जिल्ह्यातील कामाच्या बाबत समितीने नाराज व्यक्त केलेली होती. याबाबत इम्तियाज जलील यांनी तक्रार देखील केली होती. तर गेल्या महिन्यात दक्षता समितीच्या बैठकीत रावसाहेब दानवे यांनी देखील पंतप्रधान आवास योजनेच्या कामाबाबत नाराजी व्यक्त करत औरंगाबाद जिल्ह्यात संथ गतीने काम असल्याचे कबूल केले होते. त्यामुळे जिल्ह्याला दोन केंद्रीय मंत्री असताना देखील पंतप्रधान आवास योजनेचे काम संथ असल्याचे सर्वत्र पाहायला मिळत आहे
प्रधानमंत्री आवास योजनेच्या (शहरी) औरंगाबाद महापालिका स्तरावरील कामासंदर्भात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. यावेळी सहकार मंत्री अतुल सावे, गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी, जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडेय, महापालिका आयुक्त डॉ अभिजित चौधरी व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रात पात्र लाभार्थ्यांना घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासंदर्भात बॅकांनी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याचे आवाहनही करण्यात आले असल्याचे डॉ. कराड यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरे उपलब्ध करून देण्यात यावीत. ही योजना राबविताना तेथे उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांचाही बारकाईने विचार करण्यात यावा, असे निर्देश फडणवीस यांनी दिले. या योजनेच्या सद्य स्थितीसंदर्भात यावेळी सादरीकरण करण्यात आले. तसेच योजनेस गती देण्यासंदर्भात करावयाच्या कार्यवाहीबाबत आवश्यक असणाऱ्या मुद्द्यांवरही यावेळी चर्चा झाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.