आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फडणवीसांची मतांसाठी कोलांटउडी:2.50 लाख कोटींचा भार पडला तरी तोडगा काढण्याची धमक आमच्यातच

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जूनी पेन्शन योजना दिल्यास १ लाख १० हजार कोटींचा बोजा पडून राज्य दिवाळखोरीत निघेल. त्यामुळे शासन ही पेन्शन देणार नाही, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २१ डिसेंबरला विधिमंडळात केली. मात्र शिक्षक निवडणुकीत त्याचे प्रतिकूल पडसाद उमटत असल्याचे लक्षात येताच त्यांनी घूमजाव केले. ‘ही योजना बंद करण्याचे पाप काँग्रेस- राष्ट्रवादीने केले. आता ती लागू केल्यास अडीच लाख कोटींचा बोजा पडेल. पण आमच्या सरकारमध्ये त्यावर तोडगा काढण्याची धमक आहे’, असे त्यांनी मंगळवारी औरंगाबादेत सांगितले.

३ महिन्यांत ३० हजार शिक्षकांची भरती करणार
३० हजार शिक्षक भरती ३ महिन्यात करू. वित्त विभागाचा नकारात्मक शेरा असताना विनाअनुदानित शाळांना १००% अनुदानासाठी ११०० कोटी मंजूर केले. त्याचा अध्यादेश आचारसंहिता संपताच काढू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

...हा तर आचारसंहितेचा भंग : अंबादास दानवे
राज्यामध्ये निवडणूक सुरु असताना शिक्षकांना जुनी पेन्शन देण्याचे आश्वासन देणे हा आदर्श आचारसंहितेचा भंग आहे, असा दावा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. दुसरीकडे ‘वाजपेयी सरकारनेच २००३ मध्ये जुनी पेन्शन बंद केली. जर फडणवीसांमध्ये धमक होतीच तर गेल्या ५ वर्षात पेन्शन का सुरु केली नाही’, असा प्रश्न काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...