आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएक बिल भरून कट केलेला वीज पुरवठा सुरू करून घ्यावा, अशा प्रकारे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच भूमिका घेतली होती. त्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली होती. मुबलक पाणी असून शेतकऱ्यांना विजेअभावी पिकांना पाणी देता येत नव्हते. अन्न सुरक्षा आयोगाच्या आदेशाचेही उल्लंघन होत होते. ‘दिव्य मराठी’ने या विषयी १८ नोव्हेंबर रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते. याबाबत ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस एक पाऊल मागे घेतला व शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करू नये, असे आदेश आता पारित केले आहेत.
शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले आहे. मात्र, मुबलक पाणी उपलब्ध झाल्याने रब्बीचा हंगामासाठी त्याचा विनियोग केला जाणार आहे. मात्र, महावितरणने थकीत वीज बिल भरा अन्यथा वीज कनेक्शन कट केले जाईल अशा प्रकारचे मोहीम हाती घेतली होती. विशेष म्हणजे अन्नसुरक्षा आयोगाने शेतकऱ्यांची वीज कापू नये असे आदेश महावितरण दिले आहेत. या आदेशाला केराची टोपली दाखवून महावितरणने विज बिल भरले नाही तर कंपनी कशी चालेल? अशी भूमिका घेत बीज कनेक्शन कट करण्यास सुरुवात केली होती. हजारो शेतकऱ्यांची कनेक्शन कटई करण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. पिकांना त्यांना वेळेवर पाणी देता आले नाही. याबाबत दैनिक दिव्य मराठी ने वृत्त प्रकाशित केले होते. तसेच मुख्यमंत्री शिंदे व ऊर्जामंत्री फडणवीस सरकारकडे शेती पंपाचे वीज कनेक्शन कट करू नये, अशी मागणी सर्व स्तरातून करण्यात आली होती. ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांची बाजू घेण्याऐवजी वीज कंपनीची बाजू घेतली व एक बिल भरा व कनेक्शन जोडून घ्या, असे आदेश दिले. यामुळे त्यांच्यावर प्रचंड टीका झाली. विरोधी पक्षात असताना त्यांनी शेतकऱ्यांची वीज कट करून त्यांना देशोधडीला लावण्यात येत असल्याचे म्हटले होते. सत्तेत आल्यानंतर तेच शेतकऱ्यांची वीज कापण्याच्या आदेश देत आहेत, असे २ व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते. यामुळे ऊर्जा मंत्र्यांची चांगलीच कोंडी झाली होती. त्यातून सुटका करून घेण्यासाठी त्यांना आता शेतकऱ्यांची वीज कापू नये, असे आदेश पारित करावे लागले आहेत.
यापूर्वी बील भरुन वीज जोडणी करुन घेण्याची केली होती सक्ती वीज कनेक्शन तोडणे थांबवावे विजय सिंघल म्हणाले की, महावितरणकडून थकित वीजबिलांच्या वसुलीसाठी मोहिम चालू आहे. त्यानुसार ज्यांची बिले थकलेली आहेत. त्यांचे वीज कनेक्शन तोडले जाते व बिल भरल्यानंतर पुन्हा जोडले जाते. तथापि, सध्या चालू असलेला रब्बी हंगाम ध्यानात घेता त्यांचे वीज कनेक्शन कापू नये, असा आदेश उपमुख्यमंत्र्यांनी दिला. त्यानुसार महावितरणच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडणे थांबवावे.
नवीन आदेशात शेतकऱ्यांचा कळवळा : नैसर्गिक आपत्तीतील नुकसान ध्यानात घेता, वीज बिल वसुलीसाठी शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडू नयेत, असा स्पष्ट आदेश उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला असून त्यानुसार महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडणे थांबवावे, अशी सूचना महावितरणचे अध्यक्ष विजय सिंघल यांनीही तातडीने दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.