आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महावितरण:खंडित वीजपुरवठा जोडल्यास गुन्हा दाखल; महावितरणकडून थकबाकी वसुली

औरंगाबाद7 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

महावितरणकडून थकबाकी वसुली व थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू आहे. जे ग्राहक थकीत रक्कम भरत नाहीत त्यांचा वीजपुरवठा खंडित केला जातो. पण, महावितरणचे पथक मागे फिरले की, ग्राहक परस्पर वीजपुरवठा पुन्हा जोडत आहेत. त्यामुळे अवैध मार्गे वीजपुरवठा जोडणाऱ्यांविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले यांनी दिले.

वाढत्या उन्हामुळे विजेच्या मागणीत मोठी वाढ होत आहे. पण, वीज बिल वेळेत भरले जात नसल्याने थकबाकी वाढत आहे. त्यामुळे वीज खरेदीसाठी पैसे कुठून आणायचे हा माेठा प्रश्न महावितरणसमोर निर्माण होत असल्याने थकबाकी वसुलीला प्राधान्य दिले आहे. वीजपुरवठा खंडित केल्यानंतर संबंधित वीज जोडण्यांची स्वतंत्र पथकांद्वारे पडताळणी सुरू आहे. तसेच या वीज जोडण्यांची सायंकाळ नंतरदेखील विशेष तपासणी केली जात आहे. यात शेजाऱ्यांकडून किंवा इतर ठिकाणाहून वायर किंवा केबलद्वारे विजेचा वापर आढळल्यास शेजारी व वीज वापरणाऱ्या व्यक्तींविरुद्ध भारतीय विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५/१३८ नुसार फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...