आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट जन्मदाखला प्रकरण:सैनिक भरतीत ठरले होते पात्र, आरोपींचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

औरंगाबाद4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बनावट जन्म दाखला सादर करुन सैनिक भरतीत सहभाग घेतल्याप्रकरणी दाखल गुन्‍ह्यात आरोपी प्रशांत रामचंद्र महाले (20, रा. दुसाने, ता. साक्री, जि. धुळे) याने सादर केलेला अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्‍यायाधीश एस.एस. मौदेकर यांनी बुधवारी नामंजूर केला.

प्रकरणात कर्नल तरुणसिंग भगवानसिंग जमवाल (40) यांनी फिर्याद दिली. त्‍यानुसार औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, उस्‍मानाबाद, हिंगोली, जळगाव, बीड आणि लातुर या विभागाचे सैन्य अधिकारी म्हणुन फिर्यादी काम पाहतात. 2016 ते 2020 या काळात वरील विभागात सैन्‍य भरती प्रक्रिया सुरू होती. त्यावेळी जालना येथील 2017 च्‍या भरती प्रक्रियेत विजय नामदेव मनगटे (रा. वाकड, ता. कन्नड), जळगाव येथील 2018 च्‍या भरती प्रक्रियेत शंकर सुरेश वाघ (रा. पळसखेड चक्का ता. सिंदखेड जि. बुलडाणा) यांनी फॉर्म भरले होते.

उमेदवार अपात्र ठरले

2017 मध्‍ये जालना येथील महाबळेश्वर पुंडलिकराव केंद्रे (रा. दैठणा, ता. कंधार, जि. नांदेड), 2016 मध्‍ये नांदेड येथील प्रशांत रामचंद्र महाले (रा. दुसाने, ता. साक्री, जि. धुळे), किरण कौतीक भाडगे (रा. वाकड, ता. कन्नड) आणि अनीस अलाऊद्दीन शेख (रा. माळी गल्ली, परभणी) यांनी ऑनलाईन फॉर्म भरले होते. मात्र त्‍यावेळी ते उमेदवार अपात्र ठरले.

असा उघडकीस आला घोटाळा

त्‍यानंतर या सर्व उमेदवारांनी मध्‍ये सैन्‍य भरतीसाठी ऑनलाईन फार्म भरले. मात्र वरील उमेदवारांनी यावेळी आपल्या जन्‍म तारखेचे बनावट प्रमाणपत्र सादर केले. विशेष म्हणजे यावेळी सर्व उमेदवार मैदानी व लेखी परिक्षेत उत्तीर्ण होऊन भरतीसाठी पात्र ठरले. कागदपत्रांच्‍या छाननी दरम्यान हा घोटाळा उघकीस आला. प्रकरणात छावणी पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

जामीनाला विरोध

या प्रकरणात आरोपींनी गुन्‍ह्यात अटक होऊ नये यासाठी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. अर्जाच्‍या सुनावणी वेळी सहायक लोकाभियोक्ता राजू पहाडीया यांनी आरोपीने जन्‍म तारीख बदल करण्‍यासाठी वापरलेले कागदपत्र, एसएससीचे बनावट जन्‍म तारीख असलेले प्रमाणपत्र हस्‍तगत करुन तपास करायचा आहे. आरोपीने कशा प्रकारे जन्‍म तारखेत बदल केला याचा देखील तपास बाकी असल्याने आरोपीच्‍या जामीनाला विरोध केला.

बातम्या आणखी आहेत...