आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बनावट प्रमाणपत्रे:ट्रम्पोलियन खेळाच्या बनावट प्रमाणपत्राचा सुळसुळाट, 8 काेटीत विकली 279 बाेगस क्रीडा प्रमाणपत्रे!

एकनाथ पाठक | औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मंत्रालयासह पोलिस सेवेत 40 बाेगस खेळाडू

चक्क ८ काेटी ३७ लाख रुपयांची अन् आता अस्तित्वातच नसलेल्या ट्रम्पाेलियन या खेळ प्रकारात राष्ट्रीय स्तरावर पदक जिंकल्याच्या बाेगस प्रावीण्य प्रमाणपत्रांची महाराष्ट्रात विक्री करण्यात आली. याप्रकरणी क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या सखाेल चाैकशीमध्ये २७९ जणांनी ही बाेगस प्रमाणपत्रे विकत घेतली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. यामध्ये सर्वाधिक २५८ बाेगस प्रमाणपत्रधारक औरंगाबाद विभागामध्ये असल्याचे समाेर आले. ही प्रमाणपत्रे ७ काेटी ७४ लाखांत विकली आहेत. याशिवाय नागपूर विभागामध्ये २१ जणांनी ही बाेगस प्रमाणपत्रे घेतली आहेत. याच बाेगस प्रमाणपत्राच्या आधारे चक्क ४० जण शासकीय सेवेत कार्यरत आहेत. एका प्रमाणपत्रासाठी रॅकेटकडून जवळपास ३ ते साडेतीन लाख रुपये घेतल्याचे उघड झाले आहे.

राष्ट्रीय स्पर्धेतील पदकविजेत्या खेळाडूंना प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय सेवेत पाच टक्के आरक्षणाचा फायदा हाेताे. ट्रम्पाेलियन हा जिम्नॅस्टिकचा खेळप्रकार आहे. मात्र, ट्राॅम्पाेलिंग ही संघटना २००५ नंतर बंद झाली. यासाठी केलेल्या सखाेल चौकशीतून आयुक्तांना ४ हजार ७८९ पानांचा अहवाल सादर करण्यात आला.

रात्री १० ते पहाटे ५ पर्यंत कागदपत्रांची तपासणी

उपसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे सदर बाेगस प्रमाणपत्र प्रकरणाच्या चाैकशीची जबाबदारी साेपवण्यात आली हाेती. त्यांनी अहाेरात्र मेहनत घेत हे प्रकरण २ महिन्यात चव्हाट्यावर आणले. यासाठी औरंगाबादेत अचानक धडक देऊन कार्यालयात रात्री १० ते पहाटे ५ पर्यंत कागदपत्रे तपासली.

पात्र खेळाडूंना न्याय मिळेल : ओमप्रकाश बकाेरिया

बाेगस प्रमाणपत्राचे वाटप झाल्याची आम्ही सखाेल चाैकशी केली. यामध्ये जवळपास २७९ बाेगस प्रमाणपत्रधारक असल्याचे दिसून आले. त्यामुळे आम्ही चाैकशी करून हा प्रकार राेखत आहाेत. पात्र असलेल्या खेळाडूंना यातून न्याय मिळेल. यासाठी फेडरेशन आणि खेळाडूंच्या सहकार्याची माेठी गरज आहे. - ओमप्रकाश बकाेरिया, क्रीडा आयुक्त, पुणे