आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविनापरवाना सोयाबीन बियाण्याचे केडीएस-726 ( फुले संगम) या बियाणाच्या नावाखाली बनावट बियाणे विक्रीसाठी पॅकिंग करणाऱ्या कामगारांसह मालकांवर वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात 18 जून रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, येणाऱ्या खरीपच्या हंगामात सोयाबीनचे बियाणे विक्रीसाठी बाजारात घेऊन येणाऱ्या टोळीचा वाळूज एमआयडीसी पोलिसांनी अचानक छापा मारत पर्दाफाश केला आहे. 9 लाख 30 हजार रुपये खर्च करत 100 क्विंटल खुले सोयाबीन खरेदी करून ते वाळूज परिसरातील ओम इंडस्ट्रीज प्लॉट नंबर 74 गट नंबर 181 जोगेश्वरी शिवार येथे पॅकिंगचे काम सुरू होते. यासंदर्भात खबऱ्या मार्फत पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांना खात्रीशीर माहिती मिळाल्यावरुन त्यांनी अजय गवळी बियाणे निरीक्षक तथा कृषी अधिकारी पंचायत समिती गंगापूर यांना माहिती देऊन त्यांच्या पथकासह अचानक सदरील ठिकाणी छापा मारत विनापरवाना तसेच प्रत्यक्षात 17 जून रोजी पॅकिंग होत असताना बॅगवर 20 एप्रिल 2022 अशी खोटी छापील तारीख टाकून विक्रीसाठी बियाणे पॅक करणाऱ्याना ताब्यात घेतले.
गुन्हा दाखल
या प्रकरणी गवळी यांच्या फिर्यादीवरून धनजंय दत्ताजय महाजन (रा. चांगेफळ ता. सिंदखेडराजा जि. बुलढाणा) वैभव अनिल मापारी (रा. मारा ता. चिखली जि. बुलढाणा), प्रशांत नरसिंगराव निकम (रा. सिंदखेड राजा ता. सिंदखेडराजा जि. बुलढाणा) यांचे विरुध्द 18 जून रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून गोदामात असलेली 25 किलो पॅकिंगमधील 168 बॅग बियाणे व 55 किलो वजनाच्या सोयाबीनच्या 102 गोण्या, दोन शिलाई मशीन, वजन काटा कंपनीचे लेबल असलेल्या रिकाम्या 400 बॅग, 63 सत्यता दर्शक लेबल जप्त करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.