आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Fall In Temperature And Increase In Humidity In March] Unseasonal Rain Again From March 13, Possibility Of Hail, Crisis On Rabi, Adverse Effects On Mango Fruit, Increase In Health Complaints

मार्चमध्ये तापमानात घसरण अन् गारठ्यात वाढ:13 मार्चपासून पुन्हा अवकाळी पाऊस, गारपीटीची शक्यता रब्बीवर संकट; आंबा मोहरावर होतोय दुष्परिणाम

छत्रपती संभाजीनगर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवारी कमाल तापमान 34.5 सरासरी इतके होते. किमान तापमान 2 अंशांनी घट होवून ते 15.2 डीग्रीवर नोंदवले गेले. पहाटच्या गारठ्यात किंचित वाढ झाली आहे. दुपारच्या सत्रात उन्हाचा चटका सौम्य जाणवतोय. तर 13 मार्च पासून पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे रब्बीवर संकट निर्माण झाले आहे. आंबा मोहरावर दुष्परिणाम होत असून मानवी आरोग्याच्या तक्रारीतही वाढ झाली आहे.

होळीनंतर मार्च मध्ये तापमान वाढण्यास सुरुवात होते. मात्र, हवामान बदलामुळे ढगांची गर्दी होऊन काही वेळेत जेथे पोषक वातावरण तेथे हलका ते जोरदार पावसाच्या सरी कोसळल्याने मंगळवारी कमाल तापमानात 10 अंशांनी घसरण होऊन ते 25.3 आणि किमान 4 डीग्रीने कमी होऊन 13.2 वर स्थिरावले होते. बुधवारी कमाल 32.4 म्हणजे वाढ झाली असली तरी ते सरासरीच्या तुलनेत 3 डीग्रीने कमीच होते. तर किमान ४ डीग्रीने घसरण होऊन 9.7 डीग्री, गुरुवारी ते 16 व शुक्रवारी 13.3 , शनिवारी 15.2 डीग्रीवर नोंदवले गेले. यावरून तापमानात कमालीचा चढउतार होत असल्याचे स्पष्ट होते. याच बरोबर शीत, बाष्पयुक्त वारे पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे. त्यामुळे 13 मार्चपासून छत्रपती संभाजीनगरसह राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस, गारपीट होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काढणीस आलेला शेतमाल काढून सुरक्षित ठिकाणी ठेवावा. माळणी करून घ्यावी. पशुधन सुरक्षित ठिकाणी बांधणे, तसेच पर्यटनाचेही नियोजन करणे उचित ठरेल.

हवामान बदलामुळे तापमानात कमालीचे चढउतार

दिनांक कमाल किमान

7 25.3-10 13.2-4

8 32.4-3 9.7-8

9 32.7-2 16.0-1

10 33.2-1 13.3-4

11 34.5-0 15.4-2

यामुळे होणार पाऊस

उत्तर भारतात, हिमालय पर्वत रांगांमध्ये बर्फवृष्टी होत आहे. पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. तिकडील अतिशीत वारे, बाष्प आपल्याकडे वाहून येत आहेत. आपल्याकडे उन्हाळा सुरु असून उष्णता राहते. त्यामुळे कमी हवेचा दाब तयार होतोय. आकाशात ढग जमा होतात. आर्द्रता वाढली आहे. म्हणजेच उष्ण, शीत, बाष्पयुक्त वाऱ्यांचा आकाशात संगम होऊन उद्यापासून जेथे पोषक वातावरण तिथेच आवकाळी पाऊस, गारपीट होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. पाच दिवस ढगाळ वातावरण व काही वेळेत पाऊस पडेल.

बातम्या आणखी आहेत...