आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापालिकेच्या लेटरहेडवर आयुक्तांची बनावट स्वाक्षरी करून अकरा जणांना विविध पदांवर नियुक्त्या दिल्याप्रकरणी मुख्य आरोपी सोनाली ज्ञानेश्वर काळे-नामेकर (३४, रा. पानरांजणगाव, ता. पैठण, ह.मु. श्रीकृष्णनगर, शेंद्रा एमआयडीसी) हिने सादर केलेला जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. देशपांडे यांनी नामंजूर केला.
या प्रकरणी महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे प्रमुख राजू काशीनाथ सुरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, महापालिकेच्या लेटरहेडवर अकरा जणांना अग्निशमन विभागात नोकरी देण्यात आल्याबद्दलचे पत्र देण्यात आले होते. त्यावर आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांची स्वाक्षरी आहे. मुळात ही स्वाक्षरी बनावट असून लेटरहेडवर टाकण्यात आलेला आवक-जावक क्रमांक बोगस आहे. या क्रमांकाची पडताळणी केली असता त्याचा कुठलाही संदर्भ लागत नाही. या नियुक्त्यांची माहिती ४ मार्च रोजी पांडेय यांच्या मोबाइलवर व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून प्राप्त झाली. पांडेय यांनी त्याची दखल घेत पोलिसांत तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले आहे.
त्यानुसार, उमेश प्रमोदराव चव्हाण, निकिता नारायण घोडके, रोहन शिवाजी जाधव, सोपान उत्तम खांडेभराड, नितीन ज्ञानेश्वर महालकर, सचिन ज्ञानेश्वर महालकर, शुभांगी विनोद चव्हाण, प्रतीक प्रमोद चव्हाण, विभावरी दत्तात्रय चौबे, विशाल राम तायडे आणि सोनाली ज्ञानेश्वर काळे यांच्याविरोधात सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.