आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट:जायकवाडीवर पाहणी करणे तर दूरच, वन विभागाचे कार्यालय कुलूपबंद

रमेश शेळके | पैठण3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बर्ड फ्लूबाबत केंद्राने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे वन विभागाला नाही गांभीर्य

एव्हीएन एन्फ्लुएंझा म्हणजेच बर्ड फ्लूचा धाेका लक्षात घेऊन केंद्र सरकारने सर्व राज्यांसाठी गाइडलाइन्स जारी केल्या. यात स्थलांतरित पक्ष्यांचा अधिवास असलेल्या भागात लक्ष ठेवणे, पक्ष्यांचा मृत्यू झाल्यास तत्काळ अहवाल पाठवणे, सॅम्पल गाेळा करून आदी बाबतीत वेगाने कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पण पैठण येथील जायकवाडी पक्षी अभयारण्यात मात्र एकही बाब गांभीर्याने घेण्यात आलेली नाही. पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना सोबत घेऊन परिसरात पाहणी करण्याच्या सूचना चार दिवसांपूर्वी देण्यात आल्या. पाहणी सुरू झाल्याचे वन विभागाचे अधिकारी सांगत आहेत. पण प्रत्यक्षात काम सुरू झाले नसल्याचे “दिव्य मराठी’च्या पाहणीत समोर आले.

सध्या बर्ड फ्लूचा धोका नसला तरी दक्षता घेणे अत्यंत गरजेचे आहे. बुधवारी “दिव्य मराठी’ने या भागात पाहणी केली असता जायकवाडीच्या भागात पर्यटक, लोकांचा मुक्त वावर बुधवारीही दिसून आला. हिमाचल प्रदेशमध्ये १७०० पट्टेरी राजहंस पक्षी मृतावस्थेत आढळले होते. शिवाय त्यांचा अहवाल बर्ड फ्लू पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर देशभरात दक्षता घेण्यास सुरुवात झाली. पण जायकवाडीत मात्र वन विभागाकडून दक्षता घेतली जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. जायकवाडी धरण परिसरात असंख्य पाणवठे आहेत. त्यामुळे दरवर्षी मोठ्या संख्येने स्थलांतरित पक्षी येथे येत असतात. त्यामुळे येथेही त्याचा धोका संभवतो.

पक्ष्यांच्या अधिवासाला धोका

जायकवाडीवर मानवी वावर वाढल्याने पक्ष्यांसाठी ही जागाच सुरक्षित नसल्याचे दिसते. उपाययोजना करण्याकडे मात्र वन विभागाचे दुर्लक्ष होत आहे. बॅक वॉटरमधून मोटारीच्या साहाय्याने पाण्याचा उपसा होत असल्याने याच्या आवाहनाने पक्ष्याच्या अधिवासाला धोका निर्माण झाल्याचे पक्षी अभ्यासक डॉ. किशोर पाठक यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय अभयारण्य नामशेष होण्याची भीती निर्माण झाल्याचे ते म्हणाले.

अधिकारी कार्यालयात नाहीत

बर्ड फ्लूचा धोका उद्भवू नये म्हणून तातडीने वन विभागाने कामाला लागणे गरजेचे होते. त्या प्रकारचे आदेशही राज्य सरकारकडून देण्यात आले. पण परिसरात पाहणी करणे दूरच, येथील वन विभागाच्या कार्यालयात बुधवारी एकही अधिकारी अथवा कर्मचारी आढळून आला नाही. याबाबत वन संरक्षक डी. बी. गाडगीळ यांनी बोलणे टाळले.

पाहणीसाठी नऊ टीम

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार, जायकवाडी येथील पक्षी अभयारण्यात पाहणीसाठी पशुसंवर्धनतज्ज्ञ राजेंद्र नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली नऊ टीम तयार केल्या आहेत. या टीमच्या माध्यमातून बर्ड फ्लूसंदर्भात पाहणी केली जात आहे. अद्याप असा काही प्रकार जायकवाडीवर आढळून आला नाही. विजय सातपुते, विभागीय वन अधिकारी.

बातम्या आणखी आहेत...