आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निरोप:एमआयडीसीमध्ये 33 वर्षे काम करणारे मुख्य अभियंता दराडेंना निरोप

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सन १९९८ मध्ये एमआयडीसी प्रशासनात सहायक अभियंता म्हणून रुजू झालेल्या शिवहरी दराडे यांनी त्यांच्या ३३ वर्षाच्या कार्यकाळात शेंद्रा औद्योगिक परिसराचा विकास तसेच नांदेड, लातूर विमानतळाचा विकास केला. पुणे येथील चाकण, तळेगाव येथेही त्यांनी काम केले. ३० डिसेंबर रोजी एमआयडीसी प्रशासनातील मुख्य अभियंता पदावर असणाऱ्या दराडे यांच्या सहकारी अधिकारी-कामगार व उद्योजकांनी एकत्र येऊन त्यांना निरोप दिला. या वेळी मुंबई येथून खास मुख्य अभियंता एस. आर. तुपे उपस्थित होते. त्यासोबत सत्कर्ममूर्ती दराडे यांचे आई-वडील, पत्नी व मुले या कार्यक्रमाला उपस्थित होती.

या वेळी एमआयडीसीचे अधीक्षक अभियंता आर.व्ही. केंद्रे, बाळासाहेब झांजे, राजेंद्र गावडे, राजेंद्र नवले, बाळासाहेब चव्हाण, रायबा पाटील, गणेश मुळीकर, अलीम नाईकवाडे यांच्यासह उद्योजक बी. एस. खोसे, रमण आजगावकर, राहुल मोगले, विष्णू अग्रवाल, अब्दुल शेख आदींची उपस्थिती होती. मनमिळाऊ स्वभावाचे दराडे हे उत्कृष्ट शूटिंग बॉल खेळाडूसुद्धा आहेत. त्यांच्या निरोपाच्या कार्यक्रमात पुणे, नाशिक, मुंबई व औरंगाबाद येथील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...