आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायालयीन सुनावणी:शेततळ्यावरील मोटार चोरणारा कारसह जेरबंद ; 22 नोव्हेंबरपर्यंत कोठडीची शिक्षा

औरंगाबाद18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेततळ्यावरील मोटार चोरून कारमधून धूम ठोकणाऱ्या आरोपीला करमाड पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याने चोरलेली मोटार व त्याची कार जप्त करण्यात आली.भीमराव रामभाऊ सरोदे (३१, रा. सांजखेडा, ता. औरंगाबाद, ह.मु. हनुमान चौक, चिकलठाणा) असे आरोपीचे नाव आहे. प्रथमवर्ग न्‍यायदंडाधिकारी एस.जी. गुणारी यांनी त्याला २२ नोव्‍हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

आरोपी २ ते ३ मार्चदरम्यान काकासाहेब जिजाराव चौधरी (२८, रा. दुधड, ता. औरंगाबाद) यांच्या शेततळ्यातील पाण्‍याची मोटार चोरली होती. याप्रकरणी करमाड पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल झाला होता. प्रत्‍यक्षदर्शी साक्षीदार बळीराम चौधरी यांच्या माहितीनुसार, २ मार्च रोजी रात्री ८ वाजता शेतात पाणी दिल्यानंतर ते व लक्ष्‍मण चौधरी भेटले. तेथून थोड्याच अंतरावर एक कार (एमएच - २०/ ईजी ८३५०) उभी दिसली. त्‍या कारच्‍या डिकीत एक व्‍यक्ती पाण्‍याची मोटार ठेवत होता. परंतु ती त्यांचीच मोटार असेल म्हणून या दोघांनी दुर्लक्ष केले. जेव्हा काकासाहेबांच्या शेतात चोरी झाल्याचे कळले तेव्हा बळीराम यांनी संशयित कारचा दुचाकीने लाडसावंगीपर्यंत पाठलाग केला. मात्र तो पसार झाला.

पोलिसांनी कारच्या क्रमांकावरुन चौकशी केली ही गाडी सचिन चव्हाण असल्याचे समोर आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता भीमराव सरोदे याने पेशंट सोडण्‍यासाठी आपली गाडी नेल्याचे चव्हाण यांनी सांगितले. त्यानुसार पोलिसांनी सरोदेला अटक केली. मात्र या गुन्ह्यात सचिन चव्‍हाण याचादेखील सहभाग असल्याचे सरोदेने न्यायालयात सांगितले. त्याआधारे अधिक चौकशी करण्यासाठी पोलिसांनी त्याच्या कोठडीची मागणी केली होती.

बातम्या आणखी आहेत...