आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विष घेऊन आत्महत्या:कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या

टाकळी जिवरगएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून सिल्लोड तालुक्यातील कायगाव येथील शेतकरी हरिभाऊ सोनाजी खरात (३५) यांनी मंगळवारी (६ सप्टेंबर) औरंगाबादजवळील रांजणगाव येथे विष घेऊन आत्महत्या केली.

तालुक्यात गेल्या तीन ते चार वर्षांपासून कधी अतिवृष्टी तर दुष्काळी परिस्थिती आहे. यामुळे शेती करून ते औरंगाबाद येथे कंपनीत रोजंदारीने काम करत होते. या वर्षीही अतिवृष्टीमुळे शेतामध्ये पाणी साचले आणि पिके पिवळी पडली. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होणार असल्याचे त्यांना वाटले. शेती आणि कंपनीत रोजंदारी करून कर्जाचा बोजा कमी होणार नसल्याची चिंता त्यांना सतावत होती. याच विवंचनेत हरिभाऊ खरात यांनी एकटे असताना विष प्राशन केले. त्याच ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. यासंदर्भातील माहिती त्यांचे काका रामराव जयवंता खरात यांना कळताच त्यांनी या घटनेची माहिती एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात दिली. पोलिस कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन पंचनामा केला. घाटी रुग्णालयात शवविच्छेदन करून कायगाव येथील त्यांच्या शेतात हरिभाऊ यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...