आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:कपाशीला कमी भाव असल्याने शेतकऱ्याने केली आत्महत्या, पिंपळदरी येथील घटना

अजिंठा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सततची नापिकी आणि डोक्यावर असलेल्या कर्जाचा वाढणारा डोंगर आणि त्यातच कापसाचे उतरलेले भाव यामुळे शेतकऱ्याने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सिल्लोड तालुक्यातील वसई शिवारात १ फेब्रुवारी रोजी रात्री साडेअकरा वाजेदरम्यान उघडकीस आली आहे. शेतकरी अरुण महादू मगरे (रा. पिंपळदरी, ता. सिल्लोड) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.

अरुण महादू मगरे त्यांचा नावावर गट क्रमांक १६८ मध्ये एक हेक्टर जमीन आहे. त्यांच्यावर काही बँकांचे कर्ज होते. परंतु, सततची नापिकी आणि त्यातच कपाशीचेही भाव पडलेले असल्याने डोक्यावर असलेले कर्ज कसे फेडावे, या चिंतेत ते गेल्या काही दिवसांपासून वावरत होते. दरम्यान, बुधवारी रात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेलो असता घरामागील झाडाला त्यांनी गळफास घेतल्याचे त्यांच्या नातेवाइकांनी सांगितले. याची माहिती मिळताच अजिंठा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजू राठोड, अक्रम पठाण यांनी घटनास्थळी येऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी अजिंठा येथील सरकारी दवाखान्यात पाठवला. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात ४ मुले, सुना, नातवंडे, पत्नी असा परिवार आहे.

बातम्या आणखी आहेत...