आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:हाताला काम नसल्याने अल्पभूधारक शेतकऱ्याने केली रेल्वेखाली आत्महत्या

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वसमत तालुक्यातील म्हातारगाव येथे अल्पभूधारक तरुण शेतकऱ्याने हाताला काम नसल्याने उदरनिर्वाह कसा करावा या चिंतेमुळे रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. याप्रकरणी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात रविवारी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील म्हातारगाव येथे संघपाल बापूराव दातार (२७) यांचा आई, वडील, पत्नी, मुलगी, भाऊ असा परिवार असून घरी असलेल्या ३ एकर शेतीवर त्यांचा उदरनिर्वाह चालताे. त्यामुळे शेती कामे आटोपल्यानंतर ते रोजमजुरीने कामालाही जातात. मात्र या वर्षी सतत लागून राहिलेल्या पावसामुळे शेतीची कामे राहिली नाहीत. शिवाय कोविडमुळे लहानमोठे उद्योग बंद असल्याने हाताला काम मिळाले नाही. त्यामुळे आता उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला होता. शेती पिकली नाही तसेच हाताला काम नाही. यामुळे मागील काही दिवसांपासून ते अस्वस्थ होते. दरम्यान, शनिवारी ते जवळा खंदारबन येथे त्यांच्या नातेवाइकांकडे गेले होते. त्यानंतर ते परत आलेच नाही. त्यांचा मृतदेह पिंपळाचौरे गावाजवळ रेल्वेमार्गावर आढळून आला. याप्रकरणी अरुण दातार यांनी दिलेल्या माहितीवरून वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहायक पोलिस निरीक्षक बळीराम बंदखडके, जमादार कासले यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. जमादार कासले पुढील तपास करीत आहेत.

असल्याने हाताला काम मिळाले नाही. त्यामुळे आता उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला होता. शेती पिकली नाही तसेच हाताला काम नाही. यामुळे मागील काही दिवसांपासून ते अस्वस्थ होते. दरम्यान, शनिवारी ते जवळा खंदारबन येथे त्यांच्या नातेवाइकांकडे गेले होते. त्यानंतर ते परत आलेच नाही. त्यांचा मृतदेह पिंपळाचौरे गावाजवळ रेल्वेमार्गावर आढळून आला. याप्रकरणी अरुण दातार यांनी दिलेल्या माहितीवरून वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहायक पोलिस निरीक्षक बळीराम बंदखडके, जमादार कासले यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. जमादार कासले पुढील तपास करीत आहेत.