आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली आत्महत्या:डिग्रस कऱ्हाळे येथे तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

हिंगोलीएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

हिंगोली तालुक्यातील  डिग्रस कऱ्हाळे येथील एका तरुण शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून या प्रकरणी सोमवारी (ता. 11) हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिग्रस कऱ्हाळे येथील बबन लक्ष्मण कऱ्हाळे (४०) यांच्या वडिलांच्या नावे ४ एकर शेती आहे. एकत्र कुटुंब असल्याने बबन हेच शेती वाहात होते. शेतीसाठी त्यांनी सुमारे दोन लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. तर जानेवारी महिन्यात मुलीचे लग्न करण्यासाठी काही पैसे घेतले होते. मागील वर्षी परतीच्या पावसाने खरीप हंगाम वाहून गेला तर गारपीटीमुळे रब्बी पिकांना फटका बसला. त्यामुळे पिककर्ज व मुलीच्या लग्नासाठी घेतलेले पैसे कसे फेडावे याची चिंता त्यांना लागली होती. त्यामुळे मागील  काही दिवसांपासून ते अस्वस्थ होते.

दरम्यान, रविवारी रात्री शेतात झोपण्यासाठी जातो असे घरी सांगून ते शेतात गेले. मात्र आज सकाळी ते घरी परतले नसल्याने त्यांच्या कुटूंबियांनी शोध सुरु केला. यावेळी बबन कऱ्हाळे यांचा मृतदेह त्यांच्या शेताच्या धुऱ्यावरील झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक राहुल तायडे, जमादार चव्हाण यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी गजानन कऱ्हाळे यांच्या माहितीवरून हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...