आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुःखद:शेतकरी, वारकरी ते राजकारणी असलेल्या दहेगावच्या रामकृष्ण जगन्नाथ पाटील यांचे निधन

औरंगाबाद (संतोष देशमुख )5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पाटील यांचे काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह सर्व पक्षीय नेत्यांसोबत त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.

शेतकरी, वारकरी ते राजकारणी असा आपला आगळावेगळा ठसा उमटवणाऱ्या वैजापूर तालुक्यातील दहेगावचे रामकृष्ण जगन्नाथ पाटील यांची प्राणज्योत मालावली आहे. २ सप्टेंबर २०२० रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

पाटील यांचे काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह सर्व पक्षीय नेत्यांसोबत त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. राजकीय दबदबा होता. शेवटपर्यंत ते शेती, शिक्षण, संप्रदाय व ग्रामीण जनतेशी निगडीत राहिले.

वैजापूर तालुक्यातील दहेगावचे रामकृष्ण जगन्नाथ पाटील यांनी शेतकरी, वारकरी ते राजकारणी असा आपला आगळावेगळा ठसा उमटवला. सरपंच ते विधिमंडळ, संसदीय सदस्य म्हणून त्यांनी गाव ते देशपातळीवर उल्लेखनीय कामगिरी केली. कृषी समितीचे ते सदस्य व विदेशातील अभ्यास दौऱ्याचा त्यांनी पुरेपुर वापर करून १८ हजार एकर शेती बागायती केली. बालवाडी ते महाविद्यालयीन शैक्षणिक संस्था स्थापन करून शिक्षणाचे दालन सर्वांना खुले केले. याच बरोबर पारायण, धार्मिक सप्ताह घेऊन संत शिकवण सर्वदूर पोहोचवण्याचे महान कार्य केले, ते अजरामर राहिल व सर्वांना प्रेरणादायी ठरणार आहे.

दहेगांव येथे २ सप्टेंबर १९३६ रोजी रामकृष्ण बाबा पाटील यांचा शेतकरी कुटुंबात जन्म झाला होता. घरची परिस्थिती बिकटच होती. त्यामुळे शेतात काबाडकष्ट करून त्यांनी प्रतिकुल परिस्थितीत आपले दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. मुळातच चाणाक्ष्य व हुशार असलेल्याने त्यांनी शेती कामाबरोबरच जनसेवेचे काम देखील हाती घेतले. याचे फळ म्हणून १९६९ ते १९७७ दरम्यान दहेगांव व राहेगव्हाण ग्रुप ग्रामपंचायती सरपंच म्हणून त्यांची वर्णी लागली होती. यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. १९७० ते १९८९ दहेगांव विकासेवासहसोसाचे चेअरमन, १९७६ ते ८० वैजापूर पंचायत समितीचे सभापती, ऊस उत्पादकांची संख्या लक्षात घेऊन विनायक सहकारी साखर कारखाना सुरु केला. १९८० ते १९९४ म्हणजेच १४ वर्षे ते कारखान्याचे अध्यक्ष होते.

१९७६ ते ८०, १९८३ ते २००१ ते २००४ ते अध्यक्ष, २००४ ते २००८ संचालक, २०१४ ते २०१९ असे दीर्घकाळ त्यांनी औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे २५ वर्ष अध्यक्ष म्हणून जबाबदारी उत्कृष्टरीत्या पार पाडली. १९८७ ते २००२ दरम्यान त्यांनी महाराष्ट्र राज्य सह. बँक लि. मुंबईचे संचालक होते. वैजापूर विधानसभा मतदार संघातून १९८५ ते १९९४ दरम्यान लोकांनी आमदार म्हणून निवडून दिले होते. जनेतीची सेवा, शेतकऱ्यांचे प्रश्न व्यवस्थित हाताळल्यामुळे ते लोकनायक झाले व १९९७ ते १९९९ मध्ये औरंगाबाद लोकसभा निवडणूक जिंकून ते संसदेत पोहोचले होते. देशपातळीवरील कृषी समितीचे सदस्य म्हणून व कॅलिफोर्नियाला भेट देऊन विदेशातील शेतीचा अभ्यास केला होता. याची अंमलबजावणी त्यांनी मतदार संघात केली. रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना राबवून १८ हजार एकर शेती पाण्याखाली आणून शाश्वत बागायती केली आहे. बोर नदीवरील मध्यम प्रकल्प राबवून शेतीला संजीवनी दिली. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाची अडचण लक्षात घेऊन बालवाडी, मराठी व इंग्रजी मध्यामातील प्राथमिक ते माध्यमिक आणि कृषी महाविद्यालय स्थापन करून दहेगावात शिक्षणाचे दालन खुले केले. त्याचा आज मराठवाडाच नव्हे तर राज्यातील विविध जिल्ह्यातील मुलांना फायदा होत आहे. वारकरी संप्रदायात त्यांचा मोलाचा वाट आहे.

दहेगांवात सद्गुरू नारायणगिरी महाराज यांचा हरिनाम सप्ताह, दरवर्षी हरिनाम सप्ताह, श्रीमद भागवत कथा पारयण ११ दिवस व अन्नदान, महाप्रसादाच्या पंक्तीची आयोजन करणे त्यांना नेहमीच आवडत असे. यामुळे त्यांना सप्ताहसम्राट म्हणून देखील ओळखले जात असे. देशभरातून साधूसंत दहेगावत येत असे. त्यांच्या माध्यमातून संतांची अनमोल शिकवण पोहोचवण्याचे काम त्यांनी केले आहे. एवढच नव्हे तर २०१७ मध्ये नैमेश्वरअरण्य, २०१८ ला ओंकारेश्वर व २०१९ मध्ये वृंदावनात हरिनाम सप्ताह घेऊन आध्यात्मिक शिकवणी त्यांनी दिली. म्हणून त्यांना बाबा म्हटले जात असे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser