आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजयपूरच्या गजानन मते यांची सहा एकर जमीन समृद्धी महामार्गमध्ये गेली होती. त्याचा त्यांना सात कोटी रुपयांचा मोबदलादेखील मिळाला. त्यानंतर मते यांनी योग्य नियोजन करत याच परिसरात ९ एकर शेती घेतली. त्यानंतर करमाडमध्ये हॉटेलचा व्यवसाय सुरू केला, जो आता पुतण्या पाहत आहे.व्यावसायिक जागा, कृषी उत्पन्न बाजार समितीचे गााळे तसेच नव्याने नऊ एकर जमीन घेत त्यामध्ये द्राक्षाची शेती करत त्यांनी शेतीचा कायापालट केला आहे.समृद्धीमुळे आमच्या आयुष्यात समृद्धी आल्याची प्रतिक्रिया मते यांनी दिव्य मराठीशी बोलताना दिली. ही एकट्या गजाजनची कहाणी नाही तर शेकडो शेतकऱ्यांच्या आयुष्यात समृद्धी आली असून अनेकांनी व्यवसायही सुरू केले आहेत.
औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात समृद्धीच्या भूसंपादनच्या वेळी मोठा विरोध झाला होता. मात्र शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मोबदल्यामुळे शेतकऱ्यांचादेखील विरोध मावळला. विशेष म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात विरोध असताना ७० टक्के जमीन सहमतीने घेण्यात आली. त्यानंतर सक्तीच्या भूसंपादनातही २५ टक्के जमीन सहमतीने घेण्यात आली. तसेच ज्यांचे कौटुंबिक वाद होते त्या पाच टक्के शेतकऱ्यांच्या जमिनी न्यायालयाच्या माध्यमातून घेण्यात आल्या. अनेकांनी जोडधंदे सुरू केले.
दोन हजार कोटींचा मोबदला : समृद्धीतून मिळालेल्या मोबदल्यातून अनेक शेतकऱ्यांनी व्यवसाय सुरू केले. गाड्यादेखील घेतल्या. काहींनी एफडीच्या माध्यमातून पैशाच्या गुंतवणुकीचादेखील पर्याय निवडला आहे.
शेतकरी बांधकाम व्यवसायात गंगापूर तालुक्यातील टेकळेवाडीमधील किशोर जाधव यांची दीड एकर शेती, घर समृद्धीमध्ये गेले. त्यांना दीड कोटीचा मोबदला मिळाला. त्यातून त्यांनी जांभाळा परिसरात तीन एकर दहा गुंठे जमीन घेतली. तसेच स्वत:च्या कृषी सेवा केंद्राचा विस्तार केला. त्यानंतर पडेगाव कन्नड या भागात बांधकाम व्यवसाय सुरू केला. समृद्धीमुळे त्यांच्या आयुष्यातही समृद्धी आली.
कर्ज फिटले, घर बांधले, नव्याने शेती खरेदी टाकळीमधल्या ४५ वर्षांच्या अभय वंजाळ यांंची साडेआठ एकर शेतीपैकी ५० गुंठे जमीन समृद्धीमध्ये गेली होती.त्यांना ६५ लाख रुपयांचा मोबदला मिळाला. त्यातून त्यांनी शेतीचे कर्ज फेडले आणि जांभाळा परिसरात दोन एकर शेती घेतली. या पैशामुळे त्यांनी शेतात तीन विहिरी बांधून एक एकर अंजीर आणि एक एकर पेरूची बाग लावली आहे. घरदेखील बांधून घेतले आहे.
आता शेती करताना तणाव नाही गजानन मते यांची सहा एकर जमीन समृृद्धीमध्ये गेल्यानंतर त्यांनी नऊ एकर जमीन घेतली. त्यामध्ये द्राक्षाची बाग केली. आता व्यावसायिक जागा घेतली, हॉटेल सुरू केले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे चार गाळेदेखील घेतले. ते म्हणतात, आता शेती करताना कुठलाही तणाव नाही. नुकसान झाले तरी त्याची भीती वाटत नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.