आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शोधमोहिमेला यश:कळमनुरी शिवारातील बुडकी नाल्यात वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह 36 तासानंतर सापडला

हिंगोलीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 100 गावकऱ्यांनी सुरू केलेल्या शोध मोहिमेला यश आले आहे.

कळमनुरी शिवारातील बुडकी नाल्यामध्ये पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह तब्बल 36 तासानंतर रविवारी सकाळी सापडला आहे. मग दोन दिवसापासून पोलिसांचे पथक व 100 गावकऱ्यांनी सुरू केलेल्या शोध मोहिमेला यश आले आहे.

कळमनुरी तालुक्यातील असोलवाडी येथील कुंडलिक असोले व त्यांची पत्नी ध्रूपतबाई असोले कळमनुरी येथून बैलगाडीने शेतात जात असताना बुडकी नाल्यात पाण्याचा प्रवाह वाढल्याने दोघेही बैलगाडी सह वाहून गेले. शुक्रवारी 19 सायंकाळी हा प्रकार घडला. या घटनेमध्ये बैल वाचवण्यात यश आले. मात्र कुंडलिक असोले व ध्रूपताबाई असोले वाहून गेले. कळमनुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रणजीत भोईटे, उपनिरीक्षक ज्ञानबा मुलगीर व गावकऱ्यांनी शोधमोहीम हाती घेतली होती. यामध्ये शनिवारी 20 सकाळी ध्रूपताबाई यांचा मृतदेह कळमकोंडा तलावांमध्ये आढळून आला. त्यानंतर दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केल्यानंतर कुंडलीक असोले  यांचा शोध सुरू केला. मात्र रात्री उशिरापर्यंत यांचा मृतदेह सापडला नाही. या प्रकरणात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने नागपूर येथून राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे पथक बोलवले होते. आज सकाळी हे पथक हिंगोलीकडे निघाले. मात्र असोलवाडीच्या गावकऱ्यांनी आज सकाळी पुन्हा शोध मोहीम हाती घेतली. त्यानंतर त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. तब्बल 36 तासानंतर कुंडलिक असोले यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे असोलवाडी गावावर शोककळा पसरली आहे.

बातम्या आणखी आहेत...