आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

परभणी:पाचलेगावात नापिकीमुळे शेतकऱ्यांची आत्महत्या, गळफास घेऊन संपवले जीवन

परभणी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिंतूर तालुक्यातील बोरी पोलिस ठाणे हद्दीतील पाचलेगाव शिवारातील शेतकरी नारायण सुगाजी काळे (वय ६०) या शेतकऱ्याने मंगळवारी (दि.4) रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली.

नारायण काळे यांना दोन एक्कर शेती असून यंदा मन्सून नंतर दोनदा सोयाबीनची पेरणी करुन सुध्दा सोयाबीन बी बोगस निघाल्याने शेतात पेरलेले काहीच उगवले नाही. त्यामुळे हतबल होऊन त्याना नैराश्य आले होते. यातूनच घरात एकटेच असतांना त्यांनी (दि ४) ऑगस्ट रात्री ६ च्या सुमारास राहत्या घरातील लाकाडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना त्याची पत्नी शेतातून घरी आल्यावर उघडकीस आली. या शेतकऱ्यांला दोन विवाहीत मुले व एक विवाहित मुलगी असुन मुले बाहेर गावी रोजमजूरी करत असल्याने घरात हे वयोवृद्ध शेतकरी व त्याची पत्नी दोघेच राहत होते . या प्रकरणात बोरी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा करून शवविच्छेदन करण्यासाठी जिंतूर शासकीय रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणात बोरी पोलीस ठाण्यात अकस्मात मूत्यूची नोंद करण्यात आल्याचे समजते.