आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीक कर्ज:अजिंठ्यात शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळेना, तक्रारी प्राप्त, बँक मॅनेजरला धरले धारेवर ; एक कोटी कर्ज वाटपाचे टार्गेट

औरंगाबाद19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील स्टेट बँक ऑफ इंडियात शेतकऱ्यांना कर्ज वाटप होत नाही. शेतकऱ्यांच्या कर्जाच्या फाइल एक झीरो बँक कर्मचारी मनमानी प्रमाणे मंजूर करतो याची तक्रार भाजप प्रदेश चिटणीस इद्रिस मुलतानी यांना प्राप्त होताच त्यांनी गुरुवारी दुपारी एक वाजता बँकेचे मॅनेजर सुजित झोडगे यांना बँकेतच धारेवर धरले. आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी आलोय. त्यांना लवकरात लवकर कर्ज मंजूर करा. त्यांना बँकेत हेलपाटे मारायला लावू नका असे सांगून सोबत आलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या मॅनेजर समोर मांडायला लावून समस्या सोडवण्याचे सांगितले. यावेळी मेघराज चोंडिये, डॉ. गणेश दसरे, मदन सिंग ठाकूर, संजय माली, अर्जुन ठाकूर, शेख मुक्तार, प्रकाश शिंदे, राधेश्याम झलवार, जावेद देशमुख, सांडू पाटील लोखंडे तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते. संविधानाचा आम्ही पण आदर करतोय... यावेळी चर्चेत बँक मॅनेजर सुजित झोडगे यांनी मी डॉ. बाबासाहेबांना मानतो. सविधनाचा आदर करतो. त्याच प्रमाणे काम करतो असे म्हणताच यावेळी भाजपचे इद्रिस मुलतानी म्हणाले की डॉ. बाबासाहेबांना आम्ही पण मानतो. आमची कामे करा असे सांगितले. ८ महिन्यांपासून चकरा सदर बँकेत कर्जासाठी आठ महिन्यांपासून चकरा मारतोय अद्यापही पीक कर्ज मिळाले नाही. रोज काही ना काही कारण सांगून वापस केले जात आहे. काय करावे कळेना. - एम. बरडे, शेतकरी कुणालाही अडचण येणार नाही सध्या बँकेत एक फील्ड ऑफिसर, दोन क्लर्क अशा तीन जागा रिक्त आहे. जर ही रिक्त पदे भरली गेली तर आम्हीच शेतकऱ्यांच्या कर्जाच्या फाइल लवकरात लवकर निकाली काढू. बँकेचे कामकाज अजून गतिमान होईल. कोणाला अडचण येणार नाहीत. -सुजित झोडगे, मॅनेजर, स्टेट बँक ऑफ इंडिया. समस्या सोडवण्यास सांगितले सदर कर्ज मिळत नाही. बँकेत झीरो कर्मचारी शेतकऱ्यांच्या फाइलचे काम पाहताहेत आदी तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने मी बँकेत मॅनेजरला भेट देऊन वरील समस्या सोडवण्याचे सांगितले. -इद्रिस मुलतानी, प्रदेश चिटणीस, भाजप. शेतकऱ्यांची कामे वेळेत केली नाही तर आंदोलनाचा इशारा

बँकेत माणसे वाढवून द्या मी सगळ्या शेतकऱ्यांच्या फाइल निकाली काढतो. तुम्ही मला माणसे द्या, असे मॅनेजर सुजित झोडगे इद्रिस मुलतानीना सांगताच, तुम्ही माणसे द्या मला का सांगता. ठीक आहे मी माझ्या कार्यालयातील दोन माणसे देऊ काॽ असे सांगतच एकच हशा पिकल्या. कर्ज मिळत नाही याची तक्रार प्राप्त होताच भाजप प्रदेश चिटणीस मुलतानी यांनी बँकेत अधिकाऱ्याला धारेवर धरले.

बातम्या आणखी आहेत...