आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी आत्महत्या:औराळा येथील शेतकऱ्यांनी विषारी औषध प्राशन करत संपवले जीवन

औराळा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कन्नड तालुक्यातील औराळा येथील अशोक भाऊसाहेब जिवरख या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून स्वताच्या गट क्रमांक 311 असलेल्या शेतात विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास घडली. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक भाऊसाहेब जिवरख यांच्यावर महिद्रा फायनान्सचे घर कर्ज, विविध कार्यकारी सोसायटीचे मोठ्या प्रमाणात कर्ज होते. त्या सर्व कर्जाची उलटापालट करायची असल्याने पैसे नसल्याने ते गेल्या काही दिवसांपासून ते त्याच विवेचनात होते. गुरुवारी रोजच्या नित्यनेमाने प्रमाणे ते पहाटे जनावराचे शेण, व चारापाणी करण्यासाठी उठले.

ते काम आटोपल्यावर नंतर ते शेताकडे शौचालयास गेले. बराच वेळ झाला तरी वडील घरी का? आले नाही म्हणून त्यांना त्यांचा मुलगा बाळासाहेब जिवरख शेतात बघण्यासाठी गेला असता त्यांना वडील अशोक जिवरख हे मृतअवस्थेत दिसले. त्यांनी आरडाओरड केली परंतु तोपर्यंत अशोक जिवरख त्यांची जीवनज्योत माळवली होती. नातेवाईकांनी औराळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह आणला असता वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदिप कांबळे यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

दुपारी एक वाजेच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पच्छात पती, एक मुलगा, सुन, तिन मुली, जावाई नातवंडे असा मोठा परिवार आहे. देवगाव रंगारी पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मुत्युची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार शिवनाथ आव्हाळे, विजय धुमाळ करत आहे.

बातम्या आणखी आहेत...