आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
केंद्र शासनाने कृषीविषयक कायदा पारित केला असून तो शेतकऱ्यांवर अन्याय करणारा असल्याचा आरोप करत दिल्लीत शेतकऱ्यांकडून अभूतपूर्व आंदोलन केले जात आहे. याला पाठिंबा म्हणून देशातील विविध शेतकरी संघटनांनी ८ डिसंेबरला भारत बंदचा नारा दिला आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांतही याचे पडसाद पाहायला मिळत आहेत. बहुतांश जिल्ह्यांमध्ये व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात येतील. काही ठिकाणी एसटी बसेस बंद करण्याबाबत परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल. बाजार समित्याही बंद ठेवण्यात येणार आहेत. काँग्रेसकडून चक्का जाम आंदोलनाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
औरंगाबाद : दुपारपर्यंत रिक्षा बंद
- शहरात मंगळवारी बंदला पाठिंबा म्हणून रिक्षा युनियनने दुपारी ३ वाजेपर्यंत रिक्षा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे
- दिल्ली गेट येथील रास्ता रोकोमध्ये सर्व रिक्षाचालक सहभागी होणार
- बस, रेल्वे, विमानसेवा राहणार सुरू
- व्यापारी महासंघाकडून शेतकरी संपाला समर्थन परंतु व्यापारी प्रतिष्ठाने बंद राहणार नसल्याचे केले स्पष्ट
- प्रवाशांची सोय व्हावी म्हणून शहरांतर्गत स्मार्ट सिटी बस राहणार सुरू
- जिल्ह्यातील फुलंब्री, कन्नड, वैजापूर, पैठण आदी तालुक्यांतील बाजार समित्यांतील व्यवहार राहणार बंद
परभणी : व्यापारी, नागरिकांना सहभागी हाेण्याचे आवाहन
- बंददरम्यान राज्य परिवहन महामंडळाची बससेवा बंद ठेवण्यासंदर्भात सायंकाळपर्यंत वरिष्ठांकडून कोणतेही आदेश आले नाहीत
- परिस्थिती पाहून एसटी बसेस सोडण्यात येतील, अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक मुक्तेश्वर जोशी यांनी दिली
- परभणी मार्केट व्यापारी असोसिएशन नवा मोंढा येथील ्व्यवहार बंद ठेवून बंदला पाठिंबा देणार
- परभणी येथे नवा मोंढ्यातील एकता हमाल मजदूर युनियनने बंदला पाठिंबा दिला
नांदेड : परिस्थिती पाहून एसटी करणार सुरू
- जिल्ह्यात परिस्थिती पाहून एसटी बसेस सुरू ठेवायच्या की नाही याचा विचार केला जाणार आहे
- विभाग नियंत्रकांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटणकर यांच्या सूचनेनुसार बस सुरू ठेवण्याचा निर्णय -शहरातील - विविध महामार्गांवर काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती
- जिल्हाभर रास्ता रोको, चक्का जाम करण्याचा काँग्रेस प्रवक्ते संतोष पांडागळे यांचा इशारा
उस्मानाबाद : व्यापाऱ्यांसह विविध संघटना संपात होणार सहभागी
- दिल्लीतील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला उस्मानाबादकरांनी दिला पाठिंबा
- मंगळवारी सकाळी शहरातून सर्वपक्षीय कार्यकर्ते व संघटनेचे कार्यकर्ते व्यापारी व नागरिकांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करतील
- उस्मानाबादसह जिल्ह्यातील बाजारपेठ उद्या बंद राहण्याची शक्यता
- उस्मानाबादच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा मात्र यासंदर्भातील निर्णय रात्री उशिरापर्यंत झाला नसल्याची माहिती
हिंगाेली : मोंढ्यात खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद
- मोंढ्यातील शेतीमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद राहतील
- कडकडीत बंद, पुढील काळात रस्त्यावर उतरण्याचा शिवसेना आमदार संतोष बांगर यांचा इशारा
- एसटी महामंडळाच्या बसेसदेखील परिस्थिती पाहूनच सोडल्या जाणार
- राजकीय पक्षांनी नांदेड नाका, खटकाळी बायपास, अकोला बायपास येथे रास्ता रोकोचा दिला इशारा
- आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी संभाजी ब्रिगेडने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले सुरू
जालना : कंपन्या, रुग्णालये, सरकारी कार्यालये सुरू
- सरकारी, खासगी दवाखाने, मेडिकल, किराणा दुकान, सरकारी कार्यालये, औद्योगिक कंपन्या सुरू राहणार
- काही कामगार संघटनांनीही संपाला पाठिंबा दर्शवला आहे
- कापूस खरेदी वगळता कृषी उत्पन्न बाजार समिती, ट्रान्सपोर्ट, हमाल, मापाडी, कृषी विक्री, बी-बियाणे, बाजारपेठा, वर्दळीच्या ठिकाणांवरील भाजीपाला विक्री हे बंद राहतील
- परिस्थिती लक्षात घेता सराफा, कपडा, हॉटेल व्यावसायिकही बंद ठेवण्यासाठी पुढाकार घेणार
बीड : शहर, तालुक्यांत निदर्शने
- वैद्यकीय सेवा वगळता जिल्ह्यात सर्वत्र बंद पाळला जाण्याची शक्यता
- एसटी सुरू ठेवण्याबाबत परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल
- बीडमध्ये सर्व शेतकरी संघटना, पुरोगामी संघटना, राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षाचा पाठिंबा
- जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व तालुक्यांमध्ये निदर्शने केली जाणार आहेत
- शेतकरी संघटना, अखिल भारतीय शेतकरी संघर्ष समन्वय समिती, राष्ट्रीय किसान मोर्चा, शेतकरी कामगार पक्ष, संविधान सेना, संभाजी ब्रिगेड, बसपा, भारतीय बेरोजगार परिषद, ओबीसी महासंघ आदींनी संपाला दिला पाठिंबा
नांदेडमध्ये शीख बांधवांचा मोर्चा
दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनामुळे सोमवारी शहरात वातावरण तापले. पंजाबच्या शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी शीख बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून धरणे आंदोलन केले. या आंदोलनात लंगरसाहिब गुरुद्वाराचे संत बाबा बलविंदरसिंघजी सहभागी झाले.शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी भारत बंदचे आवाहन करण्यात आले. त्यापूर्वीच सोमवारी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शहरातील शीख बांधव रस्त्यावर उतरले. ट्रॅक्टरसह रॅली काढण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन झाल्यानंतर संत बाबा बलविंदरसिंघजी यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटणकर यांना मागण्यांचे निवेदन दिले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.