आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोहित्र दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांनी पैसे देऊ नये:मागणी केली, पैसे उकळले असतील तर तक्रार करा- डॉ. मंगेश गोंदवले

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोहित्र दुरुस्ती आणि वाहतुकीसाठी जो काही खर्चाचा भार येतो तो संबंधित एजन्सी किंवा महावितरणकडे आहे. त्यामुळे नादुरूस्त किंवा दुरूस्त रोहित्रांच्या वाहतुकीसाठी शेतकऱ्यांनी कंत्राटदाराशी किंवा कुणाशीही आर्थिक व्यवहार करू नयेत. कुणी पैशांची मागणी केली असेल अथवा पैसे उखळले असतील तर त्या संदर्भात रितसर तक्रार दाखल करावी, त्यांच्यावर नियमाप्रमाणे करावाई केली जाईल, आवाहन सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले यांंनी केले आहे.

सध्या रब्बी हंगाम सुरू आहे. शेतीला सिंचनासाठी सुरळीत विद्युत पुरवठयाची आवश्यकता असते. त्या दृष्टिने महावितरण प्रयत्नशिल आहे. मंजूर भारापेक्षा अधिक भाराच्या वापरामुळे रोहित्र जळण्याचे प्रमाण वाढले आहे. जळलेले रोहित्र शेतापासून ते दुरुस्ती केंद्रापर्यंत आणणे व दुरुस्तीनंतर ते तिथे बसवण्याचे काम एजन्सीला दिलेले आहे. त्यामुळे यासाठी जो खर्च येतो तो संबंधित एजन्सीने करणे अनिवार्य आहे. महावितरण हा खर्च सबंधित एजन्सीला देते. त्यामुळे शेतकऱ्यांनी यासाठी एक रूपयाही खर्च करू नये. कुणी पैशांची मागणी केली अथवा काही पैसे कुणाला दिले असतील तर त्याबाबत सबंधित महावितरणच्या अभियंत्यांकडे तक्रार करावी. त्यांच्या विरोधात नियमाप्रमाणे सक्त कारवाई केली जाईल, अशी ग्वाही डॉ. गोंदवले यांनी दिली आहे.

कॅपासिटर बसवले तर नुकसान टळेल

मंजूर भारापेक्षा अधिक क्षमतेने वीज वापरली जाते. परिणामी रोहित्र, विद्युत पंप, स्टाटर, वायर आदी उपकरणे व साहित्य जळून खाक होतात. यामध्ये अतोनात नुकसान होते. तसेच पिकांना वेळेवर पाणी देण्यात व्यत्यय येते. त्यामुळे शेतकऱ्यंानी प्रमाणित कॅपासिटर बसवून अंखडित वीज वापराचा लाभ घ्यावा, असे आवाहनही डॉ. गोंदावले यांनी केले आहे.

हे नियमबाह्य

चोरून वीज वापरणे, तीन एचपी मंजूर असतांना पाच एचपीचा पंप वापरणे चुकीचे व नियमबाह्य आहे.

अ‍ॅटोस्विचमुळे वीजपंप जळतात

अंखडित आणि सुरळित विद्युत पुरवठयाचा लाभ घेण्यासाठी कृषीपंप धारकांनी त्यांच्या वीज पंपावर अ‍ॅटोस्विच बसवू नयेत.

रोहित्र बिघाडल्यास येथे संपर्क साधा

कृषिपंपाना वीज पुरवठा करणारे वितरण रोहित्र अर्थात ट्रान्सफॉर्मर नादुरूस्त झाल्यास ते तत्काळ बदलण्यासाठी कंत्राटदार एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे. चोवीस तास सुूरू असलेल्या 18002123435 / 18002333435 या टोल फ्री क्रमांकावर घावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

बातम्या आणखी आहेत...