आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दौऱ्याचे सोपस्कार:संकट टळल्याचे हवामान विभागाने सांगितल्यानंतर शेतकऱ्यांना देणार मदत, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे आश्चर्यकारक विधान

औरंगाबाद2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
  • सर्व घडामोडींवर सरकारचे बारकाईने लक्ष, दररोज घेतला जातोय नुकसानीचा आढावा - सत्तार

राज्याचे महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी फुलंब्री तालुक्यातील पानवाडी या गावात भेट दिली. यावेळी त्यांनी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. दरम्यान यावेळी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या नुकसान भरपाईबाबत सत्तार यांनी आश्चर्यकारक विधान केले. पावसाचे संकट टळल्याचे हवामान विभागाने सांगितल्यानंतर शेतकऱ्यांना 100 टक्के नुकसान भरपाई दिली जाईल असे सत्तार म्हणाले.

पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केल्यानंतर सत्तार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, पावसाळ्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने बऱ्याच वर्षानंतर खरिपाचे चांगले पीक हाती येईल अशी अपेक्षा असताना मध्येच शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा सामना करावा लागला. परतीचा पाऊस अद्याप सुरूच आहे. या सर्व घडामोडींवर सरकारचे बारकाईने लक्ष असून दररोज नुकसानीचा आढावा घेतला जात आहे. महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून प्रत्येक नुकसानग्रस्तांना मदत करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे अब्दुल सत्तार यावेळी म्हणाले.

परतीच्या पावसाने खरीप हंगामातील काढणीला आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली. पाणी ओसरताच आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह ठाकरे मंत्रिमंडळातील सात मंत्र्यांनी रविवारी बांधावर जाऊन अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी केली. दौऱ्याचे हे सोपस्कार पार पडल्यानंतर मदतीचा ‘पूर’ येणार का? असा सवाल आहे.

बातम्या आणखी आहेत...