आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालकी क्रिकेट क्लबतर्फे आयोजित आझाद चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत अयान वॉरियर्स संघाने विजय मिळवला. नवल टाटा स्टेडियमवर झालेल्या लढतीत अयान वाॅरियर्सने फारुक कुरेशी संघावर ५ गडी राखून मात केली. या लढतीत सय्यद मुबीन सामनावीर ठरला.नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना फारूक संघाचा डाव १७ षटकांत १०० धावांवर संपुष्टात आला. यात सलामीवीर रिझवान कुरेशीने ३०, यष्टिरक्षक पांडुरंग गाजेने २१, काझी मुजीबने १५ धावा केल्या. अयानकडून सय्यद मुबीनने ३ षटकांत ११ धावा देत ३ फलंदाज बाद केले. कर्णधार सुफियान अहमद, सय्यद नूर उल हक व शेख सुमेरने प्रत्येकी २ गडी टिपले.
प्रत्युत्तरात अयान वॉरियर्सने १४.१ षटकांत ५ गडी गमावत १०१ धावा करत विजय साकारला. यात सलामीवीर अभिजित भगतने सर्वाधिक ३६ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने २२ चेंडूंत ५ चौकार व १ षटकार खेचले. सय्यद नूर उल हकने १८ धावा जोडल्या. कर्णधार सुफियान अहमदने १९ धावांची विजयी खेळी केली. तळातील फलंदाज दिनेश पाटील १७ धावांवर नाबाद राहिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.