आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभडकल गेट येथील मुलींच्या आयटीआयमध्ये आयोजित फॅशन शोमध्ये शुभांगी म्हात्रेने प्रथम, शिवानी सूर्यवंशीने द्वितीय क्रमांक पटकावला.
नववारी, ब्लू जोधपुरी, रेटरो स्टाइल, कॉस्माटोलॉजीवर हा शो घेण्यात आला. त्याचे उद्घाटन प्राचार्य मंगला पवार यांच्या हस्ते झाले. पैठणी थीममध्ये शुभांगी म्हात्रे, फाल्गुनी गाडेकर, शिवाजी निकम, दीक्षा म्हस्के, शिवानी सूर्यवंशी यांनी, तर ब्लू जोधपुरीत दीपाली कोथलकर, अनिसा मिर्झा बेग, गायत्री मगर, रेटरो स्टाइलमध्ये अंजली मापारी, दीक्षा मगरे, कशिश बावत, बेसिक कॉस्माटोलॉजीमध्ये कुमुदिनी गलांडे यांनी सहभाग घेतला. ब्लू जोधपुरी फॅशनमध्ये वैजापूरच्या गायत्री मगरेने प्रथम, सिल्लोडच्या दीपाली कोथलकरने द्वितीय क्रमांक मिळवला. रेटरो स्टाइलमध्ये सिल्लोडच्या अंजली मापारीने प्रथम, दीक्षा मगरे, कशिश बावतने द्वितीय, बेसिक कॉस्माटोलॉजीमध्ये खुलताबादच्या कुमुदिनी गलांडेने प्रथम क्रमांक मिळवला. परीक्षण संजय इंगळे, रचना ठोंबरे यांनी केले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.