आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीषण अपघात:भरधाव कार कमानीला धडकली, एअरबॅग उघडूनही बिल्डरचा मुलगा जागीच ठार

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गोपाल टी चौकात पहाटे भीषण अपघात, स्काेडा कार चक्काचूर

क्रांती चौकातून कोकणवाडी चौकाकडे जाताना गोपाल टी चौकातून वळण घेताना ताबा सुटून भरधाव कार थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या कमानीच्या कॉलमवर धडकली. हा अपघात इतका भीषण हाेता की कारची एअरबॅग उघडूनही अथर्व आशितोष नावंदर (२४) हा तरुण गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला. चालकाच्या बाजूनेच कार धडकल्याने स्टिअरिंग निखळले. अथर्वच्या मांडीचे हाड तुटून छातीला गंभीर दुखापत झाली हाेती. मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता हा अपघात झाला.

बन्सीलालनगरात राहणाऱ्या अथर्वचे वडील बांधकाम व्यावसायिक आहेत. लॉकडाऊनमध्ये महाविद्यालय बंद असल्याने मागील काही दिवसांपासून अथर्व मुंबईवरून घरी परतला होता. नेहमीप्रमाणे ताे क्रांती चौकातील जिमला जाण्यासाठी स्कोडा रॅपिड कारने (एमएच २० एफजी ७०८८) निघाला. मात्र, साडेपाच वाजता काहीतरी काम अाठवल्याने पुन्हा घराकडे वळाला. बन्सीलालनगरच्या दिशेने जाताना गोपाल टी चौक ओलांडताच वळणावर त्याचा ताबा सुटला आणि भरधाव कार थेट रस्त्यावरील दिशादर्शक फलकाच्या डाव्या बाजूला असलेल्या खांबावर जाऊन आदळली. यात कारच्या समोरील भागाचा अक्षरश: चुराडा झाला. अथर्वच्या बाजूनेच कार आदळल्याने एअरबॅग उघडूनही त्याला गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच गस्तीवरील पोलिसांनी धाव घेत त्याला कारमधून बाहेर काढून घाटीत दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. अथर्व अभ्यासात हुशार होता. सध्या तो मुंबईच्या महाविद्यालयातून डेटा सायन्सची पदवी घेत होता.

वाचवण्याच्या प्रयत्नात अपघात
घटनास्थळापासून १५ फूट अंतरापासून ते अपघातस्थळापर्यंत जोरात ब्रेक दाबल्याने टायरचे व्रण रस्त्यावर उमटले.

अचानक समोर कुणीतरी आल्याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला असावा. वेग किमान १२० ते १३० असल्याने कार नियंत्रित करता न अाल्याने खांबावर जाऊन आदळल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

चौकात बॅरिकेड्स लावलेेले आहेत. त्यातून कार काढण्याच्या प्रयत्नात देखील अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी वाटते.

शवविच्छेदनात शरीराच्या आतून मोठ्या प्रमाणात जखमा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सर्वाधिक मार छाती, तोंडाला लागला आहे. शिवाय, गुडघ्यापासून मांड्या आतील बाजूने तुटल्याने कार प्रचंड वेगात धडकल्याचा अंदाज आहे.

बातम्या आणखी आहेत...