आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हल्ला:कंपनी मालकासह मित्रांवर 11 जणांकडून जीवघेणा हल्ला; पोटात चाकू लागल्याने गंभीर जखमी, चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतजमिनीची साफसफाई करण्यासाठी गेलेल्या कंपनी मालकासह इतरांवर ११ जणांनी चाकू, तलवार, लोखंडी रॉड आणि काठ्यांनी जीवघेणा हल्ला केला. याप्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शीतल कल्याणमल पहाडे (४८, रा. घर क्र. २४, ब्लू बेल्स हाउसिंग सोसायटी) यांची चिकलठाणा एमआयडीसीत गट्टू बनवण्याची कंपनी आहे. २३ मार्च रोजी पहाडे मित्र साहिल ऊर्फ रहेमान अब्दुल शेख, अजय सुभाष ढोकळे, आदिल हिल्लाबी आणि इतर सहा जणांसोबत साडेबाराच्या सुमारास रहेमान यांच्या मौजे निपाणी शिवारातील शेत गट नं. १४१ मधील जमिनीची साफसफाई करण्यासाठी गेले होते. तेव्हा निपाणी गावातील मनोज भालेकर आणि पळशी येथील सचिन आत्माराम पळसकर, अजय आत्माराम पळसकर व इतर आठ जण तेथे आले. अजयच्या हातात चाकू, मनोजच्या हातात तलवार, सचिनजवळ लोखंडी रॉड व इतर आठ जणांकडे काठ्या होत्या.

मनोजने पहाडे व त्यांच्या मित्रांजवळ जात ‘तुम्ही या जमिनीवर कसे आले, येथून एकही जण जिवंत जाऊ शकणार नाही, तुम्हाला सगळ्यांना इथेच मारून टाकतो’, असे म्हणत अजयने पहाडेंच्या उजव्या पोटाच्या बरगडीवर चाकूने वार केला. यात ते खाली कोसळले. मनोजने तलवारीने पहाडे यांना मारण्याचा प्रयत्न केला असता आदिल हिल्लाबी हे त्यांना वाचवण्यासाठी धावले. तेव्हा तलवारीचा वार हिल्लाबी यांच्या डोक्यात लागला. यात ते गंभीर जखमी झाले. मनोज व सोबतच्या लोकांनी पहाडे यांच्या मित्रांना मारहाण करून कारची तोडफोड केली. याप्रकरणी पहाडे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...