आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूर्व वैमनस्यातून तरुणावर केला होता प्राणघातक हल्ला:आरोपीला ठोकल्या बेड्या; 15 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पूर्व वैमनस्यातून तरूणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी एमआयडीसी वाळुज पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. आरोपीला 15 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी आर.व्‍ही. सपाटे यांनी दिले. भुषण जिभाऊ खैरनार (27, रा. साराकिर्ती, वडगाव कोल्हाटी ता.जि. औरंगाबाद) असे आरोपीचे नाव आहे.

काय आहे प्रकरण?

प्रकरणात जखमी पवन मारोती हाके (27, रा. म्हाडा कॉलनी वाळूज महानगर) यांची आई सुमन हाके यांनी फिर्याद दिली. त्‍यानूसार, पवन व आरोपीच्‍या बहिणीचे प्रेमसंबंध होते. अडिच वर्षांपूर्वी आरोपीच्‍या बहिणीचे लग्न झाले. तर वर्षभरापूर्वी पवनचे लग्न झाले. दोघांचे संसार सुरळीत सुरु असतांना लग्नाच्‍या तीन ते चारमहिन्‍यांनंतर ही बाब आरोपीच्‍या भाऊजीला माहिती पडली, त्‍याने आरोपीच्‍या बहिणीशी वाद घालून तिला नांदवण्‍यास नकार दिला. तेंव्‍हा पासून आरोपी फिर्यादीच्‍या कुटूंबाशी बळजबरी भांडण करायचा. चार महिन्‍यांपूर्वी पवन व आरोपींमध्‍ये भांडण झाले. पवन विरोधात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

गुन्हा दाखल

10 डिसंबर रोजी सकाळी 9.00 वाजेच्‍या सुमारास आरोपीने पुन्‍हा फिर्यादीला शिवीगाळ करुन बघून घेण्‍याची धमकी दिली. हॉटेलवरील सामान संपल्याने पवन हा दुचाकीवर सामन आणण्‍यासाठी मोरे चौकात गेला असता, आरोपीने त्‍याच्‍या रिक्षाने (एमएच-20-एटी-7463) पवनच्‍या दुचाकीला धडक दिली. त्‍यानंतर आरोपीने पवनच्या हातावर, डोक्यावर कोयत्याने वार करुन जखमी केले. प्रकरणात एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपीला आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहाय्यक सराकरी वकील निता किर्तीकर यांनी आरोपीने गुन्‍हा करतेवेळी परिधान केलेले कपडे आणि गुन्‍ह्यात वापरलेला कोयता हस्‍तगत करायचा आहे. आरोपीचे आणखी कोणी साथीदार आहेत का याचा देखील तपास बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.

बातम्या आणखी आहेत...