आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठात लेखक नासिर सय्यद यांचे मत:फातिमा शेख यांचे कार्य संघटनात्मक स्वरूपाचे

छत्रपती संभाजीनगर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महात्मा फुले व सावित्रीबाई यांच्यासोबत सामाजिक उन्नतीसाठी फातेमा शेख यांनी कार्य केले. विशेषतः शिक्षणाबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन मानवतेची सेवा करण्याचा आणि संघटनात्मक स्वरूपाचा होता, असे मत लेखक नासिर सय्यद यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्राद्वारा ‘द फस्ट मुस्लिम वुमन टीचर ऑफ मॉडर्न इंडिया फातिमा शेख’ या ग्रंथावर शुक्रवारी (१७ मार्च) ऑनलाइन स्वरूपात चर्चा करण्यात आली. लेखक सय्यद नासिर हे याच ग्रंथाचे लेखक असून ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

केंद्राच्या संचालक प्रा. डॉ. मेहरुन्निसा पठाण अध्यक्षस्थानी होत्या. ते म्हणाले, ‘सामाजिक उन्नतीसाठी महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासोबत फातिमा शेख यांनी सक्रियपणे स्त्री शिक्षणकार्य केले आहे. परंतु त्यांची इतिहासात कुठेही फारशी नोंद दिसत नाही किंवा त्यांनी जर काही लिहिले असेल त्याचीही नोंद नाही. सावित्रीबाईंच्या पत्रामध्ये फातिमा यांचा उल्लेख आहे. फातिमा सक्षमपणे शाळा सांभाळेल असा विश्वास सावित्रीबाईंना होता. फातिमा यांचे मानवतेसाठी केलेले स्त्री शिक्षणाचे कार्य हे संघटनात्मक स्वरूपाचे आहे.

बातम्या आणखी आहेत...