आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभ्यासाशिवाय कुठला निर्णय नाही:एफडी तोडून नवीन कामे मुळीच करणार नाही ; नव्या मनपा प्रशासकांची भूमिका

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराच्या विकासासाठी सुरू झालेला एखादा प्रकल्प अधिक काळ कसा चालेल यासाठी मी प्रयत्न करेन. त्यासाठी आर्थिक सुरक्षा म्हणून ठेवलेल्या रकमेला हात लावणार नाही. उगाच एखादी एफडी (बँकेतील ठेव) तोडून प्रकल्पाचे आयुष्य कमी करणार नाही, असे नवे मनपा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी गुरुवारी (२५ ऑगस्ट) पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

पाच इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीसाठी तत्कालीन अधिकाऱ्यांनी केलेली एफडी काही महिन्यांपूर्वी तत्कालीन प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी तोडली होती. अशीच एफडी तोडून इलेक्ट्रिक बस खरेदी होणार होती. त्याला डॉ. चौधरी यांनी स्थगिती दिली. याबाबत ते म्हणाले, शहरातील बससेवा दीर्घकाळ चालवण्यासाठी एफडी आहे. त्यामुळे ती तोडणे योग्य नाही. सध्या सुरू असलेल्या बसेसचा वार्षिक खर्च, उत्पन्न आदी माहिती घेऊन पुढील विचार होईल. स्मार्ट सिटीअंतर्गत तत्कालीन मनपा आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे सीईओ डॉ. निपुण विनायक यांनी ३६ कोटी रुपयांतून १०० बसेस खरेदी केल्या. जानेवारी २०१८ मध्ये या बसेस रस्त्यावर धावायला सुरुवात झाली. ही सेवा सर्वसामान्य नागरिकांसाठी तोट्यात गेली तरी ती दहा वर्षे सुरू राहावी या उद्देशाने विनायक यांनी राष्ट्रीयीकृत बँकेत २०० कोटी रुपये फिक्स केले होते.

अभ्यासाशिवाय कुठला निर्णय नाही
स्मार्ट सिटीतील ८६ रस्ते कामांना चौधरींनी तात्पुरती स्थगिती दिली आहे. या कामासाठी कोठून निधी उपलब्ध करून देता येईल याचा अभ्यास करू. मनपा किंवा स्मार्ट सिटीतून निधीसाठी प्रयत्न केले जातील. सुरक्षित रकमांचाही विचार होईल. मात्र, जुन्या एफडीला हात लावणार नाही, असे डॉ. चौधरी म्हणाले.

तीन दिवसांआड पाणी देणे अवघड
शहराला तीन दिवसांआड पाणीपुरवठ्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार काम सुरू असून पाण्याची उपलब्धता, साठवण क्षमता, पुरवठ्याचे वेळापत्रक याची तपासणी करून खात्री पटल्यानंतरच निर्णय घेतला जाईल. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत जुनी ७०० मिमी व्यासाची पाइपलाइन बदलण्यासाठीचा १९३ कोटींचा ठराव मंजूर आहे. पीएमसीच्या प्रकल्प आराखड्यास मान्यता मिळाली आहे. याची पूर्ण रक्कम मिळावी, अशी मागणी केल्याचे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...