आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
...ताई घाबरू नका, रुग्णांची काळजी घेण्यास प्रशासन सज्ज आहे. कुठल्याही प्रकारची अडचण भासणार नाही आणि आपण लवकरच बरे होऊन घरी जाणारच असा विश्वास जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी रविवारी ता. २१ महिला कोविड केअर सेंटर मध्ये भेट घेऊन महिला रुग्णांना दिला. हिंगोली येथे राज्यातले पहिले महिला कोविड केअर सेंटर दोन दिवसांपूर्वीच सुरू करण्यात आले. या ठिकाणी कोविडची लक्षणे असलेल्या महिला रुग्णांना उपचारासाठी ठेवले जात आहे. विशेष म्हणजे महिला वैद्यकीय अधिकारी व महिला आरोग्य कर्मचाऱ्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याच्या स्थितीत या ठिकाणी आठ ते नऊ महिला रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान महिला रुग्णांना स्वतंत्र कोविड केअर सेंटर मध्ये दाखल करण्यात आल्यामुळे महिलांमध्ये आपापसात संवाद वाढून कोविड आजाराच्या मानसिकतेतून त्या बाहेर पडतील या उद्देशाने हे सेंटर सुरू झाले आहे. मात्र या ठिकाणी महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी आज दुपारी महिला कोविड केअर सेंटरला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी तेथे रुग्ण ला मिळत असलेल्या उपचारांची माहिती घेतली. त्यानंतर महिला रुग्णांची संवादही साधला.
ताई, तुम्ही काळजी करू नका. औषध उपचार व आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज आहे. याशिवाय जिल्हा प्रशासनाकडूनही आवश्यक सुविधा पुरवल्या जातील. आपण लवकरच बरी होऊन घरी परत जाईल अशा विश्वासही त्यांनी दिला. यावेळी महिला रुग्णांनी औषध उपचार व सर्व सुविधा मिळत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. जिल्हाधिकारी जयवंशी यांनी तेथे उपस्थित असलेल्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचनाही दिल्या.
नागरिकांनी नियमांचे पालन करावे - रूचेश जयवंशी जिल्हाधिकारी
हिंगोली जिल्ह्यात नवीन रुग्णांची संख्या भरमसाठ वाढत असली तरी तातडीने औषधोपचार करून रुग्णांची काळजी घेतली जात आहे. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे. मात्र अजूनही वेळ गेलेली नाही नागरिकांनी आवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. तसेच बाहेर जाताना मास्क वापरावा. सामाजिक अंतराचे पालन कराव
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.