आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठाच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार:अजित पवारांच्या हस्ते होणार सन्मान; पॅनल प्रमुख आमदार सतीश चव्हाण यांचाही विशेष सत्कार

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लोकसंवाद फाउंडेशनतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नवनिर्वाचित अधिसभा, विद्यापरिषद सदस्यांचा सत्कार विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते (दि. 11) बुधवारी सकाळी 9 वाजता रेल्वे स्टेशन रोडवरील स्मृतिशेष भानुदासराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमात विद्यापीठ उत्कर्ष पॅनलचे प्रमुख तथा मराठवाडा विभाग पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण यांचा विशेष सत्कार केला जाणार असल्याची माहिती लोकसंवाद फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. राजेश करपे यांनी रविवारी दिली.

उत्कर्ष पॅनलला यश

विद्यापीठाच्या अधिसभा, विद्यापरिषदेसह अभ्यास मंडळाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकात सर्वाधिक उमेदवार सतीश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात उत्कर्ष पॅनलचे निवडून आले आहेत. दरवर्षी त्यांच्याच माध्यमातून निवडणूक लढविल्या जातात. त्यात घवघवीत यश मिळते. यंदाही उत्कर्ष पॅनलने अधिसभेच्या 38 जागांपैकी 31 जागा जिंकल्या आहेत.

दणदणीत विजय मिळवला

उद्धव ठाकरे यांच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची एक जागा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी कॉलेज अँड टीचर्स ऑर्गनायझेशन अर्थात बामूक्टोच्या तीन अधिसभा सदस्यांचाही समावेश आहे. विद्यापरिषदेच्या 6 जागांपैकी 5 जागेवरही दणदणीत विजय मिळवला आहे. त्याशिवाय बहुसंख्य अभ्यास मंडळवर शेकडो सदस्य निवडून आणले आहेत.

नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार

या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार अजित पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी पॅनलचे प्रमुख आमदार सतीश चव्हाण, उत्कर्ष पॅनलचे मुख्य निमंत्रक डॉ. शिवाजी मदन यांचाही विशेष गौरव केला जाणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहाण्याचे अवाहन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. राजेश करपे, सचिव डॉ. गणेश मोहिते, सदस्य डॉ. राम चव्हाण, डॉ. फुलचंद सलामपुरे, डॉ. मुंजा धोंडगे, डॉ. बळीराम धापसे, सुदाम मुळे, डॉ. यूसुफ पठाण, डॉ. अर्जुन मोरे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...