आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्याचार:मुंबईच्या महिला पोलिस अधिकाऱ्यावर अत्याचार करून चित्रीकरण, नंतर धमकी देत ब्लॅकमेलिंग

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सापळा रचून मुख्य आरोपी संदीपला श्रद्धा कॉलनीतून ताब्यात घेतले

मुंबई पोलिस दलातील एका महिला पोलिस अधिकाऱ्यासोबत प्रेमाचे नाटक करून अत्याचार करत त्याचे चित्रीकरण केले. नंतर ते व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करणारा अाराेपी संदीप भरत ठाकूर (३८, रा. श्रद्धा कॉलनी, म्हाडा कॉलनी) याला मंगळवारी मुंबई पाेलिसांनी शहरातून अटक केली.

मुंबई पोलिस दलात सहायक निरीक्षक असलेल्या महिलेने पतीसोबत फारकत घेतली. त्यानंतर लग्न जुळवून देणाऱ्या संकेतस्थळावर नोंदणी केली. त्याद्वारे महिलेची औरंगाबादेतील संदीपसोबत ओळख झाली. संदीपने अापण बँकेत कामाला असल्याचे सांगून ओळख वाढवली. तसेच पत्नीसोबत पटत नसल्याचे सांगितले. मोबाइल क्रमांकांची देवाणघेवाण झाल्यानंतर मैत्री वाढली. संदीप व ती महिला मुंबईत भेटले. तेव्हा संदीपने शीतपेयात गुंगीचे औषध देऊन तिच्यावर एका ठिकाणी अत्याचार केला. त्यानंतर संदीपची पत्नी पुन्हा त्याच्यासोबत राहण्यासाठी अाली. त्यामुळे सहायक निरीक्षक महिलेचे नौदलातील एका जवानासोबत लग्न ठरले. ही बाब संदीपला माहीत हाेताच लग्न मोडण्यासाठी नौदलातील जवानाच्या मोबाइलवर अत्याचाराचे चित्रीकरण पाठवले. त्यामुळे तिचे लग्न मोडले.

त्यानंतर त्या व्हिडिओचा गैरफायदा घेत कोटला कॉलनीतील एका वकिलासह अन्य एकाने तिला ब्लॅकमेल करणे सुरू केले. त्यामुळे १२ जून रोजी पवई पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांचे एक पथक मंगळवारी पहाटे शहरात दाखल झाले. सापळा रचून मुख्य आरोपी संदीपला श्रद्धा कॉलनीतून ताब्यात घेतले.

बातम्या आणखी आहेत...