आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:वसमतच्या कुरेशी मोहल्यात सुरू होणार फिवर क्लिनिक, हॉटस्पॉट पासून रोखण्यासाठी प्रयत्न

हिंगोली10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वसमत येथील कुरेशी मोहल्ला कोरोनाचा हॉटस्पॉट सेंटर होऊ नये यासाठी  याठिकाणी  तातडीने फिवर क्लिनिक सुरू करण्याच्या सूचना शासकीय रुग्णालयाने  सोमवारी (ता.१५) वसमतच्या वैद्यकिय अधीक्षकांना दिल्या आहेत. त्यानुसार आता पुढील दोन दिवसात या ठिकाणी तातडीने फिवर क्लिनीक सुरू केली जाणार आहे. हिंगोली जिल्ह्यात अशाप्रकारचे प्रथमच क्लिनिक सुरू होत आहे.

वसमत येथील कुरेशी मोहल्ला भागातील एका रुग्णास कोरोनाची लक्षणे असल्याने नांदेड येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले होते. नांदेड येथे  त्या रुग्णाच्या स्वॅब नमुना घेतल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याची स्पष्ट झाले. मात्र काही दिवसातच त्यांचा मृत्यू झाला. सदर रुग्ण वसमत येथील असल्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली होती. जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्या सूचनेनंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोर श्रीवास,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाळ कदम, डॉ. खान यांच्या पथकाने तातडीने वसमत येथे भेट देऊन कुरेशी मोहल्ला भाग सील केला. त्यानंतर त्या भागात दहा पथकामार्फत सर्वेक्षणाचे कामही हाती घेतले. मात्र अनेकजण घराला कुलूप लावून निघून गेले होते.

दरम्यान आता सदर भाग कन्टोनमेंट घेऊन जाहीर केला आहे. त्यानंतर आरोग्य विभागाने या भागात जनजागृती केली  त्यानंतर २६ जणांचे  स्वॅब नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. या भागातच नागरिकांची आरोग्य तपासणी व्हावी यासाठी  तातडीने फिवर क्लीनिक सुरू करण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. कन्टोनमेंट झोन भागात हे क्लिनिक सुरू करून या ठिकाणी आलेल्या व्यक्तींची थर्मलगन द्वारे दैनंदिन तपासणी करावी. तसेच संशयितांना तातडीने कोरोना केअर सेंटर मध्ये भरती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे त्या भागात कोरोना बाबत ची लक्षणे असलेले व्यक्तींचे तातडीने निदान होऊन उपचार करणे शक्‍य होणार आहे. तसेच सामाजिक संक्रमण टाळता येणार असून सदर विभाग कोरोनाचा हॉटस्पॉट होण्यापासून वाचविता येणार आहे.

 याठिकाणी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची चक्राकार पद्धतीने या क्लिनिक  मध्ये नियुक्ती करावी असेही वैद्यकीय अधीक्षकांना कळविण्यात आले आहे. तसेच या ठिकाणी तपासतात आलेल्या रुग्णांची दररोज नोंद घेऊन त्याची माहिती शासकीय रुग्णालय तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत .

त्यानंतर आता वसमत येथील कुरेशी मोहल्ला भागात फिवर क्लिनिक सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून पुढील दोन दिवसात हे क्लिनिक सुरू केले जाणार असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...