आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनधिकृत बांधकामावरुन राडा:चिश्तिया चौकात दोन गट लाठ्या-काठ्या घेऊन भिडले, 16 जणांवर गुन्हा, हल्ल्यात एमआयएमचे माजी नगरसेवक जखमी

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एमआयएमचे माजी नगरसेवक यांच्या चिश्तिया चौक येथील कार्यालयासमोर अनधिकृत बांधकामावरून दोन गट लाठ्या-काठ्या घेऊन समोरासमोर भिडले होते. यात माजी नगरसेवक अज्जु शेख रहीम नाईकवाडे यांच्यासह पाच जण गंभीर जखमी झाले.

पटेल गट आणि नाईकवाडे गट समोरासमोर आल्याची माहिती सिडको पोलिसांना समजताच पोलिस उपनिरीक्षक कैलास अन्नलदास घटनास्थळी दाखल झाल्यानंतर जमाव नियंत्रणात आला. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारींवरुन पोलिसांनी १६ जणांविरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

चिश्तिया चौक येथे अनधिकृतपणे दुसऱ्या मजल्यावर बांधकाम सुरू असल्याच्या कारणावरून नाईकवाडी आणि पटेल या दोन गटात वादावादी सुरू झाली. याचे रुपांतर मारहाणीत झाले. पोलिस घटनास्थळी पोहोचले असता दोन गटात लाकडी काठ्याने भांडण चालू होते.

या वेळी पोलिसांनी शेख नासेर, शेख निसार, शेक अन्सार, शेख अर्शद, शेख सत्तार, शेख लियाकत, अज्जू शेख रहीम नाईकवाडी, अरबाज शेख, अहमद शेख, अरशद नाईकवाडी, सोयेल पठाण, नदिम पठाण, तय्यब नाईकवाडी, मज्जीद नाईकवाडी, सिंकदर शेख गऊस, राजु (पुर्ण नाव माहीत नाही) या १६ जणांसह इतर दोघांविरोधात बेकायदेशिर जमाव जमवून जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी नाईकवाडी, पटेल यांच्या गटातील लोकांनी एकमेकांविरोधात तक्रारी दिल्या.

बातम्या आणखी आहेत...