आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:शहरातील हाणामारी प्रकरणात परस्पर तक्रारीवरून 61 जणांवर गुन्हा दाखल, सहा जण पोलिसांच्या ताब्यात, धरपकड मोहिम सुरुच

हिंगोली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रिसालाबाजार येथे वाढीव पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हिंगोली शहरातील रिसालाबाजार येथील दोन गटातील हाणामारी प्रकरणात परस्पर तक्रारीवरून ६१ जणांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुरुवारी ता. ३१ गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर पोलिसांनी धरपकड मोहिम सुरु केली असून सहा जणांना ताब्यात घेतले आहे. अन्य आरोपींचा शोध सुरु करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरातील रिसालाबाजार येथे बुधवारी ता. ३० रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास किरकोळ कारणावरून दोन गटात हाणामारीची घटना घडली आहे. याप्रकरणात एका गटाने केल्या दगडफेकीमध्ये वाहनांचे मोठे नुकसान झाले असून एक कार देखील फोडण्यात आली आहे. पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे, पोलिस निरीक्षक पंडीत कच्छवे, सहाय्यक पोलिस निरीक्षक शहारे, उपनिरीक्षक कांबळे, जमादार शेख शकील, गजानन होळकर, सुधीर ढेंबरे यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

दरम्यान, या प्रकरणात आज संजय डहाळे यांच्या तक्रारीवरून शेख नुमान इब्राहिम, शेख सलमान शेख महेबुब, शेख अल्ताफ शेख अजिस, शेख आवेस शेख अजिस, शेख सलमान शेख इब्राहिम, शेख साहिल शेख लालवाले, सय्यद युसुफ सय्यद आयुब, अमिन पठाण बिस्मीला पठाण, सय्यद वसीम सय्यद करीम, शेख फैजान शेख मोहिद, सय्यद अमिर सय्यद मोईन, शेख आदिल शेख अजीज, सय्यद अक्रम सय्यद मोईन, मोहम्मद इरफान दुल्हा, इम्तीयाजखान पठाण, फरदीनखान पठाण व इतर ४० जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

याच प्रकरणात शेख नुमान यांनी दिलेल्या तक्रारीवरून चेतन होकरणे, आकाश डहाळे, योगेश होकरणे, अभी होकरणे, अरुण कहार व इतर पाच जणांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी धरपकड मोहिम सुरु केली असून त्यात ६ जणांना ताब्यात घेतले आहे. रिसालाबाजार येथे वाढीव पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

डीपी बंद करून दगडफेकीचा फंडा
या घटनेमध्ये एका जमावाने चक्क वीज कंपनीच्या डीपीवर दगडफेक करून विज पुरवठा बंद करण्याचा प्रयत्न केला. डीपीवर दगडफेकही केली, त्यातून विज पुरवठा बंद करून दगडफेक झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...