आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीड:हिवरा येथे दोन गटात तुंबळ हाणामारी; दहाजण जखमी, तिघांना गंभीर दुखापत

माजलगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गाळपेरा करण्याच्या वादावरून दोन गट भिडले

तालुक्यातील हिवरा येथील गोदावरी पात्रात गाळपेरा करण्याच्या वादावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत दोन्ही गटातील जवळपास दहाजण जखमी झाले असून तिघांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. ही घटना शुक्रवारी (ता. 11) सकाळी घडली असून अद्याप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नाही.

गोदावरी नदीपात्रात पावसाळा संपल्यानंतर उघड्या पडलेल्या जमिनीवर काही शेतकरी गाळपेरा करून रब्बीचे पिक घेतात. शुक्रवारी (ता.११) हिवरा येथील गोदावरी नदीपात्रात गाळपेरा करण्याच्या कारणावरून गावातील तौर आणि अवघडे आडनावाच्या दोन गटात वाद झाल्याचे समजते. सूत्राच्या माहितीनुसार दोन्ही गट एकाच ठिकाणी गाळपेरा करण्याचा वाद घालत असताना त्याचे रुपांतर तुंबळ मारहाणीत झाले. या मारहाणीत सुंदर लक्ष्मण अवघडे, सर्जेराव लक्ष्मण अवघडे, विष्णू सुंदर अवघडे, ज्ञानेश्वर सुंदर अवघडे, बाळासाहेब अवघडे, दिपक अवघडे यांच्यासह काही महिलांचाही सहभाग असून काहींना बीडच्या जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले. त्यातच तौर आडनावाच्या काही नागरिकांनाही दुखापत झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या मारहाण प्रकरणात रात्री उशिरापर्यंत ग्रामीण रुग्णालयात गुन्हा दाखल झालेला नव्हता.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser