आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निवडणुकीचा प्रचार मुद्द्यावरून गुद्दयावर:हिंगोलीतील गोरेगाव येथे निवडणुकीच्या कारणावरून हाणामारी; 60 जणांवर गुन्हा दाखल, रात्री जमावबंदीचे आदेश

हिंगोली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विरोधात ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याच्या कारणावरून झाला वाद

हिंगोली जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार मुद्द्यावरून गुद्दयावर आला असून सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे निवडणुकीच्या कारणावरून हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी 60 जणांवर गोरेगाव पोलिस ठाण्यात सोमवारी ता. 11 गुन्हा दाखल झाला आहे. तरी खबरदारीचा उपाय म्हणून रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आली आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील संजय नामदेवराव कावरखे हे रविवारी ता. 10 रात्री कार्यकर्त्यांसह ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचे नियोजन करण्यासाठी बसले होते. यावेळी तु आमच्या विरोधात ग्रामपंचायत निवडणूक का लढवतो या कारणावरून राजेश पाटील, अजित कावरखे, विक्रम कावरखे यांच्यासह 60 जणांनी संजय कावरखे यांना मारहाण केली. तसेच अश्लील भाषेत शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकीही दिली. या प्रकरणी संजय कावरखे यांनी आज पहाटे गोरेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी 60 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान गावात वातावरण तणावपूर्ण झाले असून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. गावातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न बिघडू नये यासाठी रात्री दहा ते सकाळी सहा या कालावधीत जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...