आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रांती चौक पोलिसांकडे दोन तक्रारी:मध्यरात्रीपर्यंत भाषणे केल्याने मुख्यमंत्री शिंदेंवर गुन्हे नोंदवा

औरंगाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबादच्या दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रविवारी पहाटे तीन वाजेपर्यंत रॅली, भाषणे, त्यांच्या स्वागतासाठी फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. सर्वोच्च न्यायालयाने रात्री दहानंतर ध्वनीप्रदूषण न करण्याबाबतचे सर्व नियम आयोजकांनी व शिंदेंनी पायदळी तुडवले, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी तक्रार दोघांनी क्रांती चौक व वेदांतनगर पोलिसांकडे केली आहे. मात्र पोलिसांनी अद्याप त्यावर काही कारवाई केली नाही. रविवारी सकाळच्या टप्प्यातील कार्यक्रम आवरल्यानंतर मुख्यमंत्री दुपारी सिल्लोडला गेले. तेथून परतण्यास त्यांना उशीर झाल्याने शहरातील उर्वरित कार्यक्रम पहाटेपर्यंत लांबले.

पोलिस कर्मचाऱ्यांवर ताण
मुख्यमंत्र्यांचा दौरा सकाळी १० ते रात्री १० पर्यंत नियोजित होता. मात्र तो पूर्णपणे बारगळला व पहाटे ३ पर्यंत चालला. सुरक्षेचा प्रोटोकाॅलच पाळला न गेल्याने पोलिस विभाग, सुरक्षा यंत्रणांवर मोठा ताण आला. जवळपास १२०० कर्मचारी, ५० अधिकारी सकाळपासून रस्त्यावर होते. पहाटे तीनपर्यंत त्यांना बंदोबस्त कायम ठेवावा लागला. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेचे नियम अत्यंत काटेकोरपणे पाळावे लागतात. परंतु या दौऱ्यात अनेक वेळा परस्पर मार्ग झाले, वाहनांचा ताफा कुठेही थांबवण्यात आला, कुणीही त्यांच्या जवळ जात असल्याने सुरक्षेबाबत अधिकारी, कर्मचाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली.

बातम्या आणखी आहेत...